“अखंड भारत” या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकिकरण होणे आपेक्षित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रिकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. म्हणून देशाची फाळणी झाली, तो दिवस म्हणजे, १४ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अखंड भारत दिन म्हणून साजरा केला जातो.
प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे. याचे एकत्रिकरण कमी वेळा झाले. अखंड भारत या संकल्पनेत, भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ व ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूटान, श्रीलंका यांचा समावेश आहे. भारत या विविधतेने नटलेल्या प्राचीन देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. सध्या आपण जो भारत बघतो, तो पूर्वी फार विशाल होता. इराणपासून इंडोनेशियापर्यंत त्याचा विस्तार होता. हिंदू धर्माचा तेव्हाच्या जागतिक राजकारणात दबदबा होता. पण काळाच्या ओघात भारताचे आणि हिंदू धर्माचे लचके तोडण्यात आले.
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तशीही एक प्रकारची सांस्कृतिक, ऐतिहासिक समानता आहे. शेकडो वर्षापूर्वी भारत देश एक महाकाय हिंदुस्थान देश म्हणून जगाला परिचित होता. इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी १८७६ ते १९४७ या ७१ वर्षाच्या कालखंडात “फोडा आणि झोडा” या नीतीचा वापर करत भारताचे सात तुकडे केले. इंग्रजांनी भारताचा सर्वात शेवटचा तुकडा १९४७ साली पाडून पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. मागील २५०० वर्षांतील देशाची जी २४ वीं फाळणी होती.

त्यानंतर भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत १९७१ साली आताचा बांगलादेश जन्माला घातला.

ज्या राजांनी मागील २५०० हजार वर्षांत भारतावर आक्रमण केले त्यांनी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांगलादेशावर आक्रमण केल्याचा उल्लेख इतिहासातील कुठल्यााच ग्रंथात नाही. त्यामुळे हे आताचे छोटे छोटे देश तेव्हा अखंड भारतात होते याला पुष्टी मिळते.
या अखंड भारत दिनी, आपण सर्व मिळून अखंड भारत निर्माण करण्याचा संकल्प करू या.

— संकलन : संजीव वेलणकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अखंड भारत हेच उद्दिष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण भारतभर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकांनी ठेवलेलं आहे.श्री राम मंदिर झाले काश्मीर भारताचे राज्य झाले दोन्ही जर्मनी दोन्ही व्हियेतनाम एकत्रित झाले नवीन इस्त्रायल तैय्यार झाले तसेच भविष्यात अखंड भारत देखील होईल अशी आमची खात्री आहे.शेजारील बहुतेक राष्ट्रांना भारतीय होण्याची इच्छा आहे.