Sunday, September 8, 2024
Homeलेखअजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी

अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी

आज २५ डिसेंबर. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती. हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याविषयीचा श्री विश्वास देशपांडे यांच्या “अष्टदीप” या पुस्तकातील लेख खास आपल्यासाठी येथे देत आहे. या पुस्तकाला तितिक्षा इंटरनॅशनल चा पुरस्कार मिळाला आहे.
अटलजींना विनम्र अभिवादन.
– संपादक

मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत – चीन आणि भारत – पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता.

अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७ च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले…..

गुंजी हिंदी विश्वमें
स्वप्न हुआ साकार
राष्ट्रसंघ के मंचसे
हिंदी की जयकार !

अटलजींनी आपल्या कार्यकाळात पुढील काही अत्यंत महत्वाची कामे केली. ११आणि १३ मे १९९८ ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गोपनीयरित्या पार पाडली गेली. या भारताने टाकलेल्या यशस्वी आणि धाडसी पावलांमुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना धक्का बसून त्यांनी अनेक अटी भारतावर लादल्या. पण वाजपेयी सरकारने या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना केला.

१९ फेब्रुवारी १९९९ ला पाकिस्तान समवेत संबंध प्रस्थापित करणे चांगले लोकशाहीला घेणे सदा.ए.सद नावाने तेहौर बस सेवा सुरू करण्यात आलेले स्वत: ला वाजपेयी पाकिस्तानला गेले. भारत पाक संबंध सुरळीत करण्यासाठी लोकशाही दाखल. महत्त्वाची शहरे महामार्गे जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भुज प्रकल्प कार्यान्वित केली. वर्ष अधिक जुना का १०० वेरी जलविवाद सोडविला.
सर्व अधिकारांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला. कोकण रेल्वेच्या पायाभूत विकास व टेलीकाॅम नितीची पावले उचलून पाऊल उचलणे. आर्थिक सल्लागार, व उद्योग क्षेत्र सुरक्षा व्यापाराची रचना केली आहे. याशिवाय लोकहिताच्या अनेक महत्वाची भयाची तडीस नेली.

अटलजी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. काव्यशास्त्र विनोदात रमणारा एक जिंदादिल माणूस… राजकारणाच्या धामधुमीतही अटलजींची काव्य आणि लेखन प्रतिभा कार्यरत होती. मेरी संसदीय यात्रा, मेरी इक्यावन कविताये, संकल्प काल, शक्ती से शांती, फोर डीकेड्स इन पार्लमेंट, कैदी कविराज की कुंडलिया आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. जीवनाबद्दल एका कवितेत सुरेख भाष्य करतात

जन्म मरण का अविरत फेरा
जीवन बंजारो का डेरा
आज यहाँ कल कहाँ कुच है
कौन जानता किधर सवेरा…

भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला आणि दिशाहीनांना नवी दिशा देत होती.

हम पडाव को समझे मंझिल
लक्ष्य हुआ आँखो से ओझल
वर्तमान के मोहजाल मे
आनेवाला कल न भुलाए
आओ फिरसे दिया जलाएँ…

आपल्या वाणीनं सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे अटलजी तसे मितभाषी होते. त्यांना निसर्गात रमायला, निसर्गाची विविध रुपं बघायला आवडायची. ते संगीताचेत्यांचा छंद होता. गीत रामायण ऐकायला त्यांना अतिशय आवडायचं. त्यामुळे बाबुजींशी म्हणजेच सुधीर फडकेंशी त्यांची खास मैत्री होती. भीमसेन जोशींनाही ऐकायला ते अतिशय उत्सुक असत. भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असताना पुण्यात झाली होती. पण कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी कणखर भूमिका घेतली.
दांव पर सब कुछ लगा है
रुक नही सकते, टूट सकते
है मगर हम झुक नही सकते…

ते आपल्या कवितांबद्दल बोलताना म्हणतात, ’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत.
ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल.’’

अटलजींना आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे सन्मानाचे पुरस्कार लाभले. या विद्वान, कवी मनाच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याचा गौरव २५ डिसेंबर २०१४ ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार ’’भारतरत्न’’ देऊन करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः २७ मार्च २०१५ ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले.

अटलजींना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांनी करोडो भारतवासीयांच्या हृदयात कायमचे आदराचे स्थान मिळाले आहे. हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे.

२५ डिसेंबर हा अटलजींचा जन्मदिवस गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या काळात खरी गरज अटलजींसारख्या स्वच्छ, चारित्र्यवान, अभ्यासू आणि निष्कलंक नेत्यांची आहे. अटलजी आज जरी आपल्यात नसले तरी जीवन कसं जगावं याचा आदर्श त्यांनी आपल्या उदाहरणातून घालून दिला आहे. ज्यांना वाजपेयींना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्या विविध विषयावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांचा जरूर अभ्यास करावा.

— लेखन : विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. भारताच्या कवी हृदय असलेल्या पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर शब्दांनी टाकलेला प्रकाश अप्रतिम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments