Home बातम्या अधिकारी व्हायचंय ?

अधिकारी व्हायचंय ?

1

मुलामुलींमध्ये शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी व त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू करावी, यासाठी गेली २२ वर्षे डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी व मिशन आयएएस फाउंडेशन झटत आहेत.

यासाठी आतापर्यंत विविध प्रकारच्या उपक्रम यशस्वीपणे राबविल्या गेले आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून मिशन आयएएस ने शिवराज्यभिषेक दिनानिमित्त ६ जून ते १२ जून २०२२ या कालावधीमध्ये सात दिवसांचे निवासी स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर अमरावती येथे आयोजित केले आहे .

या शिबिरासाठी दहा ते पंचवीस वर्षे असा वयोगट ठेवण्यात आला आहे. या शिबिरामध्ये प्रामुख्याने युपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप व त्या साठी करावयाची तयारी, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास याबाबत सकाळी आठ ते रात्री आठ असे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे.

शिबिरासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संयोजकांनी माफक दरात भोजन व निवास व्यवस्था केली आहे. या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी विविध वरिष्ठ अधिकारी आणि स्पर्धा परीक्षात यशस्वी झालेले उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात “प्रथम येईल, त्यास प्रथम प्रवेश” या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. तरी जागा मर्यादित असल्यामुळे संभाव्य उमेदवारांनी लवकरात लवकर 98 90 96 70 03 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मिशन आयएएसचे संचालक डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी केले आहे.

नरेशचंद्र काठोळे

– लेखन : देवेंद्र भुजबळ ☎️9869484800

1 COMMENT

  1. खुपचं छान उपक्रम .खुप धन्यवाद.
    असाच उपक्रम माळशिरस तालुक्यातील अधिकारीं पदावर असलेले मंडळी नी सुरू केला आहे. ग्रामीन भागातील मुंलाना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन वनिवासाची सोय केली आहे .माझा भाचा I. P. S. झाला आहे .तो पण उपक्रमात आहे .
    धन्यवाद। 🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version