Home बातम्या नागपूर : दोन वैद्यकीय दिग्गजांचा गौरव

नागपूर : दोन वैद्यकीय दिग्गजांचा गौरव

0

1 जुलै हा डॉक्टर्स डे म्हणुन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय व अनुकरणीय कार्याबद्दल डॉ. पी. के. देशपांडे आणि डॉ. दिलीप गुप्ता यांचा एम्स नागपूर येथे सन्मान करण्यात आला.

या सन्मानामागे दडलेला एक प्रेरणादायी योगायोग म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या छोट्याशा गावातून आपल्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या या दोन्ही वैद्यकीय दिग्गजांची तब्बल ७५ वर्षांची अतूट मैत्री आजही तितकीच दृढ आहे. जीवनातील अनेक चढ-उतारांना सामोरे जात, एकमेकांची साथ देत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासह समाज जीवनात स्वतंत्रपणे मोठे योगदान दिले आहे. त्यांना मिळालेला सन्मान हा त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाचा आणि कार्याचा गौरव होता.

एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत पी. जोशी यांच्या हस्ते या दोन दिग्गजांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व डीन डॉ. दुबाशी यांनी या दोन्ही मान्यवरांचा परिचय करून देत त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.

खचाखच भरलेल्या सभागृहात हा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक, तसेच इंटर्नशिपचा पहिलाच दिवस सुरू करणारे नवोदित इंटर्न मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. देशपांडे आणि डॉ. गुप्ता यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाने उपस्थितांना वैद्यकीय सेवेत समर्पण, प्रामाणिकपणा, मैत्री आणि मानवसेवेचे अनमोल धडे दिले. डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version