आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, पोस्टल कॉलनी वाकड संघाची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच आदर्शपणे संपन्न झाली. सभेला नगरसेविका स्वातीताई मयूर कलाटे, ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा वृषालीताई मरळ, इतर संघांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह 230 ते 240 सभासद हजर होते.
संघाचे अध्यक्ष श्री भागवत कोल्हे यांनी सर्वांचे स्वागत केले. संघातील निधन झालेल्या सभासदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवर व संघाचे पदाधिकारी यांच्यामार्फत दीप प्रज्वलन करण्यात आले.
कला मंच मधील महिलानी गणेश वंदन शारदा स्तवन व स्वागत गीत सादर केले. मान्यवरांचे सत्कार करण्यात आल्यावर त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
माननीय स्वातीताई कलाटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. महिलांची संख्या जास्त असलेल्या या संघात अनेक प्रकारचे उपक्रम होतात. संघाच्या यशस्वी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा.”
माननीय वृषाली मरळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “संघाला विरंगुळा केंद्र नाही. तेव्हा विरंगुळा केंद्र मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन.”
यावेळी वय वर्ष 75 असणाऱ्या सभासदांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यामध्ये मुरलीधर लहाने, श्रीकांत रेवणवार, मनोहर चौधरी, भास्कर आगलावे, शिवाजी सिद्धांति, निवृत्ती पाटील, अरुण काळे, शशिकला पेडणेकर, शालिनी नारखेडे, मंजू पटवर्धन, पारूबाई पवार, देवयानी जोशी व मीरा बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे काही विशेष सत्कार करण्यात आले. त्यामध्ये ज्ञानेश्वर गिरमे, रेखा गिरमे, माधव बराटे, यांचा योग गुरु म्हणून सत्कार करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय खुराश इन्स्टिट्यूट मध्ये तज्ञ म्हणून निवड झालेले डॉक्टर संतोष तेली, युरोपियन पातळीवर जुडोमध्ये ब्रांझ पदक मिळवणाऱ्या शिल्पा तेली आणि भारतातील त्वचेवर काम करणारे सर्वोच्च संस्था मध्ये त्वचारोग तज्ञ डॉक्टर नंदिनी तेली यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. माननीय मयूर भाऊ पांडुरंग कलाटे मा.नगरसेवक (पिंपरी चिंचवड महानगरपालिका) संघाचे आधार स्तंभ असल्यामुळेच संघ यशस्वी वाटचाल करत आहे. त्यानंतर सभेपुढे येणारे विषय घेण्यात आले.
शेवटी आभार प्रदर्शन व पसायदान झाल्यानंतर सर्व सभासदांना जेवण देण्यात आले व त्यानंतरच सभा विसर्जित करण्यात आली.
सभेच्या नियोजन व कार्यामध्ये संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर लहाने, संघाचे सचिव सुरेश बोरकर, सहसचिव आप्पासाहेब तेली व खजिनदार माधव बराटे यांनी परिश्रम घेतले.
सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गिरमे यांनी केले.
महिला मंडळ व त्यांच्या अध्यक्ष सौ कळमकर तसेच श्री कुलकर्णी व देसाई यांचेही सहकार्य मिळाले
या सभेला “आदर्श सभा” अशा प्रकारचा सन्मान उपस्थित प्रेक्षकांकडून मिळाला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800