पंचभूतांचा झालो पतंग कोरा कागद निळसर रंग,
पांडुरंगा मी पतंग तुझे हाती धागा ..
असे वर्णन संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात केले आहे. या मनुष्यदेहाला पंचभूतांचा पतंग अशी उपमा देऊन त्याच निसर्गाशी असलेलं एकत्मकार नातंच जणू यातून सांगितलं आहे. संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे जेव्हा म्हणतात तेव्हा आपण या विशाल सृष्टीचे घटक आहोत याचा पुनःप्रत्यय येतो.
या पाच तत्वांपैकी,
पंचभूतांचा झालो पतंग कोरा कागद निळसर रंग,
पांडुरंगा मी पतंग तुझे हाती धागा ..
असे वर्णन संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात केले आहे. या मनुष्यदेहाला पंचभूतांचा पतंग अशी उपमा देऊन त्याच निसर्गाशी असलेलं एकत्मकार नातंच जणू यातून सांगितलं आहे. संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे जेव्हा म्हणतात तेव्हा आपण या विशाल सृष्टीचे घटक आहोत याचा पुनःप्रत्यय येतो
या पाच तत्वांपैकी पृथ्वी (माती) हे स्थीरतत्व. तसा याचा क्रम लावणं अवघडच आहे.
भाद्रपद महिना गणपतीच्या आगमनाने सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. गणपती हे विद्येचे आराध्य दैवत प्रत्येक शुभकामाची सुरवात आपण गणेश वंदनेने करतो. भाद्रपद चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यत बाप्पांचा निवास भूतलावर असतो . आणि दहा दिवसानंतर ते अनंतात विलीन होतात. माती पासून बनविलेली मूर्ती पुन्हा पाण्यात विसर्जित होऊन मूळ रुपात जाते.
आपला प्रवास उगमाकडून पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाकडेच जाणारा आहे हे अधोरेखीत होत. पृथ्वी म्हणजे माती हे अनंतरूप तत्व आहे.
पृथ्वी सारखाच ग्रह आपल्या आकाशगंगे बाहेर सापडल्याचे वृत्त नुकतेच नासातील शास्त्रज्ञांनी दिले आहे. अजून यावर बरीच संशोधन व्हायची आहेत. त्या ग्रहावर पाणी, माती असल्याचे अजून खात्रीलायक आढळून आलेले नाही. म्हणजे मातीचा तूर्त तरी पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे. मातीच सखोल नात आहे ते सृजनाशी … मातीचा अंगीभूत गुणधर्मच म्हणा हवं. तर निर्मितीच वरदान मिळालेली माती सृष्टीतील सर्वच सजीवांचे उदरभरण करते, एका अर्थे ती साऱ्यांची जगतजननीच नाही का ?
यातील भाव दाटून आला की ती केवळ मृत्तिका न राहता ती मातृभूमी होते. शेतकऱ्यांची धारणीमाता. सीतेलाही तिच्याच पोटी जन्म घ्यावासा वाटला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि आळंदीच्या सोमेश्वर मंदिराला तीर्थाची सर आली. मानवी शरीरातील जडत्व म्हणजे मातीच .. एकदा प्राण निघून गेला की जो कलेवर उरत ते स्थूल रूपातील हे तत्व.
पदार्थास वस्तुमान व आकारमान असते असे पदार्थविज्ञान सांगते. पृथ्वीवरील प्रत्येक घटकावर गुरुत्वीय बल कार्यरत असल्याने वजनाच्या बाबतीत मात्र माध्यमनुसार भिन्नता आढळते. या नियमानुसार आपल्यावर देखील होणाऱ्या संस्काररूपी गुरुत्वीय बलामुळे आपले वजन समाजात वेगवेगळे असू शकते.
गोलाकार चक्रावर मातीच्या गोळ्याला आकार देणारा कुंभार एक समान मातीतून वेगवेगळी मडकी, भांडी बनवतो ..प्रत्येक भांड्याची व्यवहारातील भूमिका वेगवेगळी असते. परंतु या सर्वांच्या ठायी वसंत असत समान तत्व. परस्पर भिन्नता असून देखील आपल्याला या सृष्टीशी तादात्म्य साधत आंतरिक एकता अनुभवता येते. पृथ्वी प्रमाणेच इतर तत्वेही आपणास याच मार्गे घेऊन जातात.

– लेखन : संजय शंकर पालकर
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800