Home साहित्य अनुवादित कथा

अनुवादित कथा

0

“भ्रम”

‘नलिनी,
तुझ्या वडलांची पुण्यतिथी येतेय. ’फोनवरून नलिनीची आई बोलत होती.’
‘होय आई, माझ्या आठवणीत आहे. येणं अवघड आहे.
पण इथेच, भोजन आणि दान-दक्षिणेची व्यवस्था करेन.’ असं बोलून नलिनीने फोन ठेवून दिला.

संध्याकाळी सूरज; तिचा पती घरी आला, तेव्हा नलिनीने आपली इच्छा त्याला सांगितली. त्यावर तो म्हणाला, एवढ्या मोठ्या डामडौलाची काय गरज आहे ? बाबांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मंदिरात जाऊन छोटीशी पूजा करू यात.’

नलिनीचं मन भरून आलं. तिने आपलं मोठं घर पाहिलं. कमरेला लटकलेल्या तिजोरीच्या चाव्या पाहिल्या. त्या तिजोरीत किती तरी पैसे आणि दाग-दागीने तिने सांभाळून ठेवले होते. सूरज पैसे वगैरे सगळं तिच्या हातात द्यायचा आणि प्रेमाने म्हणायचा, ’सगळं तुझ्या नशिबानेच मिळालय. सगळं तुझंच आहे. तूच सांभाळून ठेव. हे सगळं आठवून नलिनीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं, कशी दुविधा आहे. सगळं माझं आहे, पण माझा कशावरच अधिकार नाहीय !.
— मूळ हिन्दी लेखिका : नुरुस्सबा शायान.

उज्वला केळकर

— मराठी अनुवाद : उज्ज्वला केळकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version