Home साहित्य मोबाईल पुराण

मोबाईल पुराण

0

मोबाईल सोबत मैत्री
भूक तहान हरपते रे
कोणी आणते अडथळा
येती अंगावर काटे रे

एवढासा जीव तुझा
काम करोडोंची करी रे
सुख, दुःख, संकटाचा
आहे महान वाटेकरी रे

छंद तुझा लागला
मैत्री भाव जमला रे
करमत नाही रे देवा
जिव्हाळा लागला रे

जन्म दाता कुठे राहतो
मजशी ठाऊक नाही रे
नाही रे मोबाईल देवा त्यासी
अनंत धन्यवाद द्यावी रे

छान छान परिवार
भेट सदैव घडवी रे
सांज सकाळ होता
एकमेकास आठवी रे

ज्ञानियांचा राजा तू
अनेक प्रश्नच उठती रे
अडचणींवर मात करोनी
उत्तर क्षणात भेटती रे

ग्रंथ, पुराण, नाना भाषी
खजिना अनमोल रे
विश्वात असे प्रश्नही सुटती
अभ्यास तुझाच सखोल रे

हरवला कुटे तर बा
मजला चैनच पडते रे
सकाळ सायंकाळ तुला
हृदयाशी मित्रा जपते रे

सर्व देश विदेशातील
भेटतो गोतावळा क्षणात रे
अर्ध्या भेटीचा आनंद
साचवते सदा मनात रे

मुले झाली खोडकर फार
नव नवीन खाण्या मागती रे
तुझ्या सहाय्याने बाबा
शोध घेता खाण्या सुटती रे

तुझे किती गुणगान गाऊ
शब्द पडती थिटी रे
सागरासमान खोली तुझी
गीत ऐकण्या बोली मिठी रे

शोभा कोठावदे

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version