Home बातम्या अनोखा वाढदिवस

अनोखा वाढदिवस

0

वाढदिवस तुमचा..आनंद सर्वांचा..! या नवी मुंबईतील प्रभात स्वयंसेवी संस्थेच्या उपक्रमात अनेक जण आपल्या मुला-मुलीचा वाढदिवस साजरा करतात. परंतु तीन वर्षांपूर्वी निधन झालेल्या आपल्या मुलाचा अनोखा वाढदिवस त्याच्या आईवडिलांनी नुकताच साजरा केला. त्या मुलाचे नाव आहे नागेश तुकाराम लोखंडे. जाणून घेऊ या एक अत्यन्त हृदयस्पर्शी व तेव्हढीच प्रेरक कहाणी……

तुकाराम हे नाका कामगार मुकादम म्हणून काम करतात तर त्यांच्या पत्नी तुर्भे येथे फुटपाथवर कांदे-बटाटे विक्रीचा व्यवसाय करतात.

तुकाराम लोखंडे

अशाप्रकारे हातावरचे पोट असणारे हे कामगार दाम्पत्य तुर्भे येथील झोपडपट्टीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात.

त्यांचा मुलगा नागेश लोखंडे तीन वर्षांपूर्वी अपघातात गंभीर जखमी होऊन ब्रेन डेड झाला. त्यानंतर या परिवाराने आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या काळजाचा तुकडा असणाऱ्या नागेशच्या आठ अवयवांचे दान केले.

अशाप्रकारे मृत्यु पश्चातही अवयवदानाच्या माध्यमातून आठ जणांचे जीव वाचविण्याचे महान कर्तव्य या परिवाराने पार पाडले.

ही गोष्ट इथेच संपत नाही. आपला मुलगा या आठ जीवांच्या माध्यमातून आजही आपल्या मध्ये आहे ही सदभावना या परिवाराने आजही जपली आहे. यासाठीच सामाजिक भावनेतून नागेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुकाराम लोखंडे नुकतेच स्वतः प्रभात ट्रस्ट च्या सौर उर्जेवर आधारित जगातील पहिल्या फिरत्या नेत्रालया द्वारे मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप या उपक्रमात सहभागी झाले..

गुरूकडून मिळालेली शिकवण आपण आत्मसात करतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुकाराम लोखंडे यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिलेली शिकवण आपण सर्वांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. तरच प्रतीक्षा यादीत वर्षानुवर्ष असणाऱ्या रुग्णांना अवयव प्रत्यारोपण करणे शक्य होणार आहे.

चला तर मग आपणही अवयवदानाचा संकल्प करूया आणि प्रभातच्या माध्यमातून अवयवदान दूत बनवूया..

– लेखन : डॉ. प्रशांत भा. थोरात – नेत्ररोग तज्ञ
अध्यक्ष, प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version