समाजात दिवसेंदिवस जेष्ठ नागरिक आणि युवक यांच्यातील दरी वाढत आहे. त्यांनी एकमेकांना समजून घेऊन जीवन जगले पाहिजे यासाठी प्रयत्न “आनंद निलायम” विविध प्रकारचे उपक्रम हाती घेणार आहे.
या उपक्रमांची माहिती देऊन त्यात समाजाचा सहभाग निर्माण व्हावा या उद्देशाने संस्थेच्या खोपोली जवळच्या जागेत नुकताच एक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मुख्य प्रवर्तक श्री जगन बाबू गंजी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाचा प्रारंभ एप्रिल २०२१ मध्ये करण्यात आला. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे या प्रकल्पाच्या उभारणीचे काम कठीण परिस्थितीत सुरु आहे. भाड्याने घेतलेली ही जागा भविष्यात मालकी तत्त्वावर घेऊन ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच समाजातील विविध घटकांसाठी लोकोपयोगी उपक्रम सुरु करण्यात येतील.
तसेच पालीजवळ २६ एकर जागेत वृद्धाश्रम उभारण्यात येईल. वेगवेगळया राज्यांमधील वेगवेगळे कायदे यामुळे देशभरात एकजिनसीपणाने काम करण्याची गरज असल्याने संस्थेची नोंदणी ‘विना नफा‘ तत्वावर सेवा उद्योग म्हणून करण्यात आली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम, तरुणांसाठी लोक सेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, गोपालन व वैद्यकीय शिबिरे असे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी विविध वृद्धाश्रमांची चौफेर माहिती देणारे विवेचन केले.
आनंद निलायमच्या सर्व कार्यक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन समनव्यक श्री सचिन शिंदे यांनी केले. उपस्थितांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला.
संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुख अमिता कदम यांनी सूत्रसंचालन केले.
श्री गोकुळदास येशीकर (ज्येष्ठ पत्रकार, खोपोली), श्री सुरेश खेडकर (अध्यक् रोटरी क्लब, खोपोली),
श्री संजय पाटील व श्री अनिल खालापूरकर (माजी अध्यक्ष, रोटरी क्लब खोपोली), श्री प्रशांत गोपाले (पत्रकार, दैनिक पुढारी व पुण्यनगरी), श्री समाधान देसले (पत्रकार, खोपोली), देवश्री भुजबळ (पत्रकार, मुंबई), मधुसूदन काठोडे, सौ वैशाली डुंबरे (उद्योजिका, ओझोन सोफा ठाणे), पत्रकार सौ मंजुळा म्हात्रे, ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्री. सुरती, तसेच भिवंडी व कल्याण येथील आर्य समाजाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
आर्य समाजाच्या पुरोहितांनी यज्ञाचे महत्व सांगून एका यज्ञाचे आयोजन केले. श्री. व सौ. म्हात्रे दांपत्याने तसेच उपस्थितांनी यज्ञ विधीत भाग घेतला.
– टीम एनएसटी. 9869484800
आनंद निलायम …एक चांगला समाजाभिमुख उपक्रम!!
Thanks Bhujbal sir.
Team Anand Nilayam Senior Citizen Home Khopoli center.
Mtmjaganbabu@gmail.com Whatsapp 7718825503,9819043703,9769324678