गोल्डन लेटर्स बालविकास संस्था, प्रोजेक्ट पाटी पुस्तक याच्या अध्यक्षा डॉ राणी खेडीकर यांनी ट्रस्ट चा एक उपक्रम म्हणून नुकतीच एक दिवसीय बाहुली नाट्य आणि सादरीकरण कार्यशाळा आयोजित केली होती. पाचवी ते आठवी पर्यंतच्या ३० मुलांचा या कार्यशाळेत सहभाग होता.
या मुलांना पपेट कसे बनवले जातात याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेत मुलांकडून वेगवेगळे पपेट बनवून घेण्यात आले. त्यांनी बनवलेल्या पपेटच्या व्यक्तिरेखेसाठी संवाद लेखनही करून घेण्यात आले.कल्पना चावला, पीटी उषा, राणी लक्ष्मीबाई आणि राणी अहिल्याबाई असे चार गट तयार करून त्यात मुलांची विभागणी करण्यात आली होती.
प्रत्येक गटाला वेगवेगळे टास्क देण्यात आले होते. त्यानंतर मुलांनी तयार केलेल्या पपेटनुसार त्यांच्याकडून संवाद लिहून घेऊन त्यांचे सादरीकरण करण्याचा सराव करून घेण्यात आला.छोटेखानी सादरीकरण स्पर्धाच या चार गटांत घेण्यात आली होती. ही सर्वच मुले हुशार होती. त्यामुळे पहिला, दुसरा नंबर कुणाला द्यावा हा प्रश्न परीक्षकांना पडला होता.इतक्या सुंदर आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही पपेट शो कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेत विविध पपेट बनवणे आणि त्यांचे सादरीकरण करणे या गोष्टीत सर्व मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.सर्व मुले खूप हुशार आणि चुणूकदार होती.
पपेट शो मार्गदर्शक सौ.कल्पना गवरे मॅडम यांनी पपेट शो सादर केल्यावर आणि तो शो बघितल्यावर उपस्थित सर्व मुले भारावून गेली. ती उस्फूर्तपणे त्यांच्या अवतीभवती गोळा झाली.मॅडम पुन्हा कधी येणार पपेट शो घ्यायला ? आणि आम्हाला पपेट कसे बनवतात हे प्रशिक्षण द्यायला ? निरागस मुलांचे प्रश्न ऐकून सर्व उपस्थित भावुक झाले होते.अगदी चार तासांच्या सहवासात त्या गोड निरागस मुलांना पपेट आणि पपेट शो करणाऱ्या गवरे मॅडम यांचा लळा लागला होता. खरोखर मुले ही देवाघरची फुले. त्यांच्या मनात कोणताही भेदभाव नसतो.ती निरागस असतात याची प्रचिती या कार्यशाळेत आली.
जेष्ठ गझलकार श्री.रवींद्र सोनवणे यांनीही या कार्यशाळेत विशेष मार्गदर्शन केले.
आयडीयल स्कूल मधील ही बालके पाटी पुस्तक या प्रकल्पात देखील सामील आहे. सीएट टायर्स कंपनी च्या सामाजिक विभागाने या कार्यशाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली होती.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800