आयुष्याच्या संध्याकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्या वेळी मानपत्र देऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते तेव्हा आतापर्यंत समाजासाठी, आपल्या माणसांसाठी केलेल्या कार्याची दखल घेतल्याचे समाधान तर मिळतेच, त्याहून उपस्थितांकडून गुणगौरव ऐकताना कृत्य कृत्य झाल्याचे समाधान चेहऱ्यावर झळकते.
महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध व्यवसाय विभागातून उपमुख्य दक्षता अधिकारी म्हणून जवळपास 20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेले श्री अशोक कुंदप हे एक समाज सेवेने झपाटलेले व्यक्तिमत्व होय. केवळ नोकरीत असतानाच नव्हे तर, निवृत्ती नंतरही आपले ज्ञान, अनुभव याचा समाजासाठी कसा उपयोग होईल ? याचा केवळ विचारच न करता ते प्रत्यक्ष कृती करीत आले आहेत.
कुंदप यांच्या या कृतिशिलतेचे महत्वाचे पाऊल म्हणजे नुकतेच त्यांनी लिहिलेल्या “अन्नधान्यातील भेसळ कशी ओळखावी ?” या अत्यंत जीवनोपयोगी पुस्तकाचे प्रकाशन सातारा येथे वैधमापण विभागाच्या उपनियंत्रक ज्योती पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर कासार समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर, न्यूज स्टोरी टुडे या वेबपोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ, महाकालिका ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड हेमंत कासार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत, स्वागतगीताने केले तर सर्व मान्यवरांनी या पुस्तकाचे विविध प्रकारे महत्व विशद करून श्री कुंदप यांच्या कार्याचे कौतुक केले.
या वेळी प्रा प्रमोद दस्तुरकर आणि निशिकांत धुमाळ यांनी करिअर विषयक मार्गदर्शन केले, तर कासार समाजाचे अध्यक्ष यांनी त्यांचे विचार मांडले.
तर युवा उद्योजक अभिषेक नळे आणि प्रणित कुंदप यांनी प्रेरणादायी अनुभव कथन करून युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योजकते कडे वळावे असे आवाहन केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाकलिका ट्रस्ट च्या वतीने श्री कुंदप यांना मानपत्र देऊन, जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच न्यूज स्टोरी टुडे या वेबपोर्टल तर्फे संपादक देवेंद्र भुजबळ आणि निर्मात्या सौ अलका भुजबळ यांनी ही श्री अशोक कुंदप व सौ आशाताई कुंदप यांचा सत्कार केला. इतरही अनेक व्यक्तींनी त्यांचा सत्कार केला.
या भरगच्च कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रश्मी हेडे यांनी केले. कार्यक्रमास श्री कुंदप यांचे सहकारी, स्नेही, विविध मान्यवर आणि कुंदप प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
कुंदप यांच्या या उपक्रमाच्या You tube👌चॅनेल वर व्हिडिओस पाठवायच्या कां हे त्यांनी ठरवले पाहिजे सर्व जनसामान्यांस ते कळले पाहिजे
हे केवळ ललित स्वरूपाचे पुस्तक नाही तर समाजोपयोगी साहित्य आहे.