मुंबईमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गिरणी कामगार विभागात नायगाव येथे १९४८ साली अपना बाजारची स्थापना झाली. ७८ व्या वर्षात पदार्पण केलेल्या अपना बाजारच्या २२ शाखा असून जवळजवळ ४०० कर्मचारी या संस्थेत काम करतात. सध्या मॉलची संस्कृती वाढत असताना देखील आपला दर्जेदारपणा व गुणवत्ता टिकून सहकारी तत्वावर चालणारी “अपना बाजार” ही भारतातील एकमेव सहकारी संस्था असावी.
अशा या अपना बाजारच्या नवी मुंबईतील सानपाडा शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी कामगार नेते तथा सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष श्री. मारुती विश्वासराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याहस्ते या नवीन शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी अपना बाजारचे अध्यक्ष अनिल गंगर व उपाध्यक्ष श्रीपाद फाटक यांची विशेष उपस्थिती होती.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी अपना बाजारचे कौतुक करत स्थानिक नागरिकांना दर्जेदार व वाजवी दरात वस्तू उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या शाखेमुळे सानपाडा परिसरातील ग्राहकांना मोठा लाभ होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

अपना बाजारचे संचालक प्रसाद महाडीक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं.
या नव्या शाखेच्या उद्घाटनास विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
