करीता वंदन, सुख आम्हा देशी,
दुःख तू हरीशी, मोरया रे.
तूची एक दंत, आणि वक्रतुंड,
सरळ ही सुंड, मोरया रे.
कटी पीतांबर, विशाल हे कर्ण,
शोभे गौर वर्ण, मोरया रे.
महाकाय आणि, तूंदिल तनू ही,
मनास ती मोही, मोरया रे.
पाश नी अंकुश, केले तू धारण,
आम्हा ते तारण, मोरया रे.
रिद्धीसिद्धी धनी, पार्वती तनया,
राहो तुझी माया, मोरया रे.
अजाण अज्ञान, बालके रे आम्ही,
आमुचा तू स्वामी, मोरया रे.
मोदक घेऊनी, देई आशिर्वाद,
आम्हा तो प्रसाद, मोरया रे.
यश हमखास, घेता तुझे नाम,
करण्याधी काम, पका म्हणे.

– रचना : प्रकाश गजानन राणे