व्यक्त व्हा प्रियजनांनो..
आजच्या व्यस्त जीवनशैलीत साधे व्यक्त होणे लोकांना जमत नाही तर चेहऱ्यावर निखळ हास्य येणे दूरची बाब आहे. विचारांची गती जशी वेगाने वाढत आहे पण त्यास व्यक्त होण्यास कुठेतरी थांबलेली दिसते. त्याबरोबर वैचारिक सखोलता व विषयाचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. लेखणी व कलेच्या जोरावर जागृकतेचे बीज रुजवण्यासाठी करामसाप बेंगळूरू विभाग आयोजित करत आहे मराठी भाषिकांसाठी खुली स्पर्धा.
स्पर्धेचा विषय आहे, ‘अभिजात मराठी आमुची“
मराठीला अभिजात दर्जा मिळाला ही मराठी भाषिकांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. याच विषयाला धरून आपण पुढील मुद्यांवर व्यक्त होऊ शकता.
१. मराठी भाषेचा इतिहास काय सांगतो ?
२. मराठी भाषेचा दर्जा कसा वाढेल ?
३. माझ्या मराठीसाठी मी काय करायला हवे ?
आपण दिलेल्या विषयावर कविता, गझल, लेख व चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकता. आपले सृजनात्मक साहित्य व कलाकृती पुढील फेसबुक लिंकवर पोस्ट करा.
https://www.facebook.com/groups/7400174633395086/?ref=share&mibextid=NSMWBT
पोस्ट करताना सुरुवातीला कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद असे लिहा.
नंतर आपले नाव, शहर, संपर्क क्रमांक व शिर्षक लिहा.
आपले साहित्य व कलाकृती १० ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत दिलेल्या लिंकवर पोस्ट करा. या दरम्यान पाठवलेल्या निवडक पोस्ट अप्रुव करण्यात येतील.
लेखासाठी शब्द मर्यादा ५०० ते १०००. तर
कविता जास्तीत जास्त १६ ओळींची असावी.
चित्रकला – रेखाचित्र, अर्कचित्र, व्यंगचित्र यातून कुठलाही प्रकार घेऊ शकता.
सहभागींनी आपली सर्वोत्तम एक पोस्ट पाठवायची आहे. पण ही पोस्ट कुठेही शेअर केलेली नसावी.
निकाल मराठी भाषा गौरवदिनी, म्हणजे २७ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल. दर्जेदार साहित्य व उत्तम कलाकृतीला कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, बेंगळूरू विभाग येथून ऑन लाईन प्रमाणपत्र देण्यात येईल.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800