Wednesday, July 2, 2025
Homeसंस्कृतीअभिनव गुरू दक्षिणा

अभिनव गुरू दक्षिणा

“गरज सरो, वैद्य मरो” अशी आपल्यात एक म्हण आहे. पण कधी कधी सुखद अपवाद दिसून येतो. आणि आपले मन सुखावून जातो.

असाच एक छान, अभिनव गुरू दक्षिणा देणारा कार्यक्रम नुकताच कल्याण येथे झाला. कल्याण येथील ज्ञानमंदिर हायस्कुलच्या १९७२ साली इयत्ता पाचवी पासून एकत्र असलेल्या आणि १९७८ साली एस एस सी झालेल्या तत्कालिन विद्यार्थ्यांच्या ‘मैत्रीची पन्नाशी’ असा हा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमात तत्कालीन शिक्षक व नंतर मुख्याध्यापक राहिलेले, विख्यात कथाकथनकार, चित्रकार श्रीधर केळकर यांचा सर्व विद्यार्थ्यांनी हृद सत्कार केला.

यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना केळकर सर म्हणाले, मी ३७ वर्षे शिक्षक म्हणून वावरलो. त्यातील ७ वर्षे मु्‌ख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली. हे करताना ३७ वर्षे कशी संपली ते कळलेही नाही. चित्रकलेचा शिक्षक असताना अन्य शिक्षकांच्या अनुस्थितीच्या तासाला मी वर्गावर जाऊन मुलांशी हितगुज करीत असे. त्यांना गोष्टी सांगत असे. त्या मुलांत मी रममाण होत असे. त्यांच्यासोबत मी खेळलो आहे, हसलो आहे, रडलो आहे.

इसापाच्या कथा तंत्राचा अभ्यास करत त्यातील नितीचा संदेश लक्षात घेऊन आपणही कथा रचल्या असे सांगत तमाम प्राणीपक्षी शिस्त, प्रामाणिकपणे आपापले आयुष्य व्यतीत करत असताना मनुष्यप्राणी मात्र आजकाल अनितीवर आधारीत वर्तन करतो याबद्दल खंत व्यक्त करीत नितीच्या गोष्टी कुणीतरी सांगायला पाहिजेत म्हणून आपण कथाकथनाचे कार्यक्रम करत गावोगावी फिरल्याचे श्री केळकर यांनी यावेळी नमूद केले.

याप्रसंगी विचारमंचावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सचिव सौ चित्रा बाविस्कर, सौ.सरिता केळकर याही उपस्थित होत्या.

यावेळी श्री केळकर यांचा या सर्व माजी विद्यार्थ्यांतर्फे शाल, सन्मानपत्र, भेटवस्तू, वस्त्रप्रावरणे देऊन गुरुपूजन करीत प्रमुख पाहुण्या सौ. चित्रा बाविस्कर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आपली शासकीय सेवा बजावत असतानाच उच्च शिक्षण घेत, प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळीत लिखाण, संगीत याही क्षेत्रात रुची दाखवल्याबद्दल
सौ. बाविस्कर यांना सन्मानपत्र, भेटवस्तू, महावस्त्र देऊन श्री केळकर यांच्या हस्ते यावेळी गौरवण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्या या नात्याने केलेल्या भाषणात गुरुचे महत्व विविध पौराणिक दाखले देऊन बाविस्कर यांनी गुरुचे महत्व विशद केले.

नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात विविध संघर्ष करीत असतानाही आपले माजी शिक्षक यांची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवणाऱ्या ज्ञानमंदिर हायस्कुलच्या मित्रमैत्रिणींचा उल्लेख “दुःख अडवायला अभिनव गुरू दक्षिणा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ अशा शब्दात त्यांनी केले.

उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना यावेळी अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र व ‘मैत्रीच्या पन्नाशी’चे सुबक संस्मरणचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सौ. बाविस्कर यांनी सर्वांना यावेळी पितळी दिव्यांची भेट दिली.

कार्यक्रमाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष शरद ननावरे यांनी यावेळी कराओके वर गीते सादर केली.

सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माजी विद्यार्थी राजेंद्र घरत यांनी केले.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४