विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. विमलताई गाडेकर या चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापक होत्या. त्यांचे काही कविता संग्रह आणि कथा संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या साहित्यावर गोंडवाणा विद्यापिठातील काही विद्यार्थी पी एच डी करित आहेत. आंबेडकरी साहित्यात त्यांच्या साहित्याचा आणि कार्याचा नेहमीच आदराने उल्लेख केला जातो. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.
विमलताईंच्या द्वितीय स्मृती दिनी, रविवार दि. 26 मार्च 2023 रोजी मुंबईत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
प्रारंभी भिक्खु विनय बोधीप्रिय महाथेरो, नांदेड, स्टार प्रवाह वाहिनीचे क्रिएटिव्ह हेड, नरेंद्र मुधोळकर यांनी
प्रा. विमलताई गाडेकर यांच्या कार्याचे स्मरण केले.
चंद्रपूरच्या कर्तुत्वाचा गौरव
मुंबईत स्वकर्तुत्वावर मोठ्या पदांवर गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील पाच मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
हे गौरव मूर्ती व त्यांचे कार्य पुढील प्रमाणे आहे.
१) अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल
महानिर्मीती येथे सौर प्रकल्प विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या श्रीमती अर्चना राणे – चोपडे.

२) जनसंवाद क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी
मुंबई विद्यापिठाचे जनसंवाद विभाग प्रमुख डॉ. सुंदर राजदीप.

३) विधी क्षेत्रातील कार्यासाठी राज्य शासनाचे विधी सल्लागार तथा मंत्रालयातील विधी व न्याय विभागाचे सहसचिव नितीन जिवने.
४) सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल महामुंबई मेट्रो ऑपरेशन लिमिटेड मध्ये संचालक (फायनान्स) असलेले निखिल मेश्राम.

५) प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी बद्दल कोकण प्रादेशिक विभाग, ठाणे येथिल सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे.
यावेळी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर विमलताईंनी लिहिलेल्या, सुशिल सहारे दिग्दर्शित आणि ॲड. चौताली बोरकुटे-कटलावार यांनी अभिनय केलेल्या ‘चंदनी दरवळ’ या अभिनाट्याचे व प्रा.विसुभाऊ बापट यांचा विश्व विक्रमी जागतिक एकपात्री काव्य नाट्यानुभव, ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी साहित्य, नाट्य आणि चित्रपट सृष्टीशी संबधित मान्यवर उपस्थित होते.
पहिला विमल दिवस
विमलताईंच्य पहिल्या स्मृती दिनी चंद्रपूर येथे त्यांचे अप्रकाशित साहित्य ‘कोवळे कंच’ आणि त्यांच्या आठवणी जागविणारे ‘विमल ताई गाडेकर-व्यक्ती आणि वाड.मय’ या दोन संग्रहांचे प्रकाशन आणि निमंत्रितांचे कवि संम्मेलन आयोजित केले होते.
विमलताईंचे थोरले चिरंजीव डॉ. हेमंत हे भोपाळ येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन वैद्यकीय विद्यापिठाचे प्रकुलगुरू आहेत. मोठ्या कन्या अर्चना शंभरकर माहिती जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहायक संचालक आहेत. मुलगा जयंत सिने अभिनेता आहे. तर धाकटी कन्या डॉ.मोना या ‘अर्गोकेअर’ या व्यवसायिक आरोग्य क्षेत्रात काम करणा-या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
‘विमल दिवस’ एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.