Saturday, March 15, 2025
Homeबातम्याअभिनव साकव्य संमेलन

अभिनव साकव्य संमेलन

आजच्या व्हॉट्सॲप च्या जमान्यात हजारो समूह तयार होतात. प्रत्येक समूह स्थापन करताना एक निश्चित उद्देश असतो. पण बहुतेक समूह मूळ उद्देशापासून लवकरच भरकटतात. अर्थात याला अपवाद असणारे काही सन्मान्य समूह आहेत. त्यातीलच एक म्हणजे साहित्य, कला, व्यक्ति विकास मंच अर्थात साकव्य हा होय.

४ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या या समूहाने अनेक साहित्यिक उपक्रम सातत्याने राबविले आहेत. कोरोना काळातही ऑनलाईन पद्धतीने विविध प्रकारची संमेलने घेऊन आपल्या उपक्रमात खंड पडू दिला नाही, हे विशेष.

अशा या साकव्य समूहाने नुकतेच एक दिवसाचे पहिले प्रत्यक्ष साहित्य संमेलन आयोजित केले. वाचू या, या अभिनव संमेलनाचा वृत्तांत…....
– संपादक

साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, नाशिकचे पहिले जागतिक साकव्य संमेलन नाशिक येथे देश विदेशातील सदस्यांच्या उपस्थितीत थाटात पार पडले.

प्रारंभी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर संमेलनाचे प्रमुख पाहुणे, अभिनेते सी.एल.कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात संमेलनाचे अध्यक्ष कवी पांडुरंग कुलकर्णी, अभिनेते दीपक करंजीकर, सी.एल. कुलकर्णी, बाळासाहेब मगर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

श्री दीपक करंजीकर यांनी संमेलनास शुभेच्छा देताना अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं. भविष्यात ट्विटर, फेसबुकवर देखील संमेलने भरवावित अशी अपेक्षा व्यक्त केली .

डॉ.राजेश आहेर यांनी संमेलनाला शुभेच्छा देत नटसम्राट मधील बेलवलकर ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या सादर केली.

डॉ राजेश आहेर , नटसम्राट सादर करताना

श्री सी.एल.कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना साकव्य ने ‘कला संस्कृतीची जोपासना’ ही छान कल्पना राबवली असून प्रत्येक माणसापर्यंत साकव्य पोचून कलासंस्कृती जोपासली पाहिजे असे सांगितले.

श्री बाळासाहेब मगर यांनी ‘साकव्य उपक्रम’ नव्या पिढीला साहित्याची ओळख करून देणारे ठरतील. शहरात किती साहित्यिक आहेत, साहित्याचा किती जागर चालतो यावर शहराची ओळख असते असे सांगत विनोद आणि वक्तव्य हे दोन विषय साकव्य ने आपल्या कार्यक्रमात समाविष्ठ करण्याची सूचना केली.

विश्वास बँकेचे चेअरमन व रेडिओ विश्वासचे प्रमुख श्री विश्वास ठाकूर यांनी भविष्यातही अशा सांस्कृतिक कार्यक्रमास आपला मदतीचा हात सदैव असेल असे सांगितले.

साकव्यच्या सुरुवातीपासून कार्यरत होत्या त्या साकव्यकन्या कै.डॉ.रसिका जाधव देशमुख कलादालनात त्यांच्या चित्रांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच त्यांच्या परिवारास साकव्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन व वाटप करण्यात आले.

यावेळी साकव्य सदस्या जयश्री कुलकर्णी व सुजाता पुरी यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले.

सकाळच्या सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मेघना साने यांनी दिमाखदार पणे केले. तर प्रास्ताविक साकव्य उपाध्यक्ष डॉ. चिदानंद फाळके यांनी केले. सर्वप्रथम साकव्य सचिव चंद्रशेखर शुक्ल, मंदार सांबारी आदींनी साकव्य गीत सादर करून वातावरण निर्मिती केली.

भोजन पूर्व गजल विविध कला व व्यक्तित्व विकास कार्यक्रम पार पडले. यात गायत्री भट मुळे यांनी लावणी, जलातरंग वादन, रज्जाक शेख निफाड यांचे क्लोरोनेट वदन, शैलजा देशमुख, तृप्ती देशमुख, प्रवीण व्यास, डॉ लक्ष्मीकांत भट, सुरेखा मैड, अर्चना पंडित यांचे गायन, परदेशस्थ नलिनी खापरे यांच्या नाट्यछटा, चारुकेशी लवाटे यांचे नारदीय कीर्तन यांनी संमेलनात रंग भरले.

गजल सादरीकरण कार्यक्रम गझलकार अभिजित काळे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे गझलकार संजय गोरडे, व गोरख पालवे यांच्या उपस्थितीत पार पडला. रामचंद्र कुलकर्णी, प्रदीप तळेकर, डॉ मृणाल कुलकर्णी, रवींद्र सोनावणे, हेमंत कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी आदी अनेक दिग्गज गझलकरांनी अजरामर केला. गझल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार राज शेळके यांनी केलं.

दुपारनंतरच्या सत्रात अनेक कवींच्या कवितांनी कार्यक्रमात रंगत आणली. परदेशस्थ कल्पना गवरे, नीला बर्वे, तसेच विलास कुलकर्णी, स्वाती रत्नपारखी, संजय माकोणे, दीपक पटेकर, मंदार सांबारी, आदिती मसुरकर, अनिल देशपांडे, राखी जोशी, भारती देव, डॉ.चिदानंद फाळके, आदी अनेकांनी काव्यरचना सादर केल्या. काव्य सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सौ.सुमती पवार होत्या तर प्रमुख पाहुणे संजीव दिघे होते.

प्रा.सुमती पवार यांनी सहभागी कवींचे कौतुक करून आपली रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

श्री.पांडुरंग कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांचे कौतुक केले. साकव्यची घोडदौड अशीच सुरू रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. काव्य मंचाचे सूत्रसंचालन राखी जोशी व भारती देव यांनी केलं.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व साकव्य सदस्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.

जे साकव्य सदस्य आपल्यात नाहीत अशा डॉ.रसिका जाधव, निशिकांत देशपांडे, आणि साकव्य गीतकार अरविंद ढवळीकर यांची आवर्जून आठवण करण्यात आली.

या संमेलनाच्या आयोजनासाठी साकव्य अध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ.चिदानंद फाळके,
सचिव चंद्रशेखर शुक्ल, खजिनदार प्रियंका कुलकर्णी, श्री विलास कुळकर्णी आदी कार्यकारिणी सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

भावबंधन कार्यालयाचे बाळासाहेब मगर, विश्वास बँकेचे विश्वास ठाकूर आदींनीही मोलाचे सहकार्य केले.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. साकव्य साहित्य स्पर्धा एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments