‘मी उद्योजक होणारच…’ हा मराठा उद्योजकांचा भव्य दिव्य असा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये प्रचंड उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अर्थसंकेतचे संस्थापक संपादक श्री अमित बागवे यांना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री. नारायण राणे यांच्या हस्ते ‘मराठा समाज रत्न’ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
आर्थिक व उद्योग साक्षरता क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अल्प परिचय
श्री बागवे यांनी मुंबई विद्यापीठातून बी. कॉम., एम. कॉम., एम. ए. मराठी, एम. ए. संस्कृत या पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांचा ऍडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स, पत्रकारिता व संमोहन या विषयांचा सुद्धा अभ्यास आहे.
बागवे यांनी गुंतवणूक व उद्योजकता या विषयांवर मराठीतून १२ व इंग्रजीतून २ पुस्तके लिहिली आहेत.
श्री बागवे यांनी ब्रॅंडिंग, सोशल मिडिया मार्केटिंग, बिझनेस नेटवर्किंग, नवउद्योजकता, आर्थिक साक्षरता, गुंतवणूक व शेअर मार्केट अशा विविध विषयांवर अर्थसंकेतच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत शेकडो कार्यक्रम करून महाराष्ट्रातील उद्योजकांना प्रगती पथावर येण्यास मदत केली आहे. महाराष्ट्रातील विविध उद्योजकीय संस्था व उद्योजकीय कार्यक्रमांना अर्थसंकेतच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली जाते.
महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड अर्थात महाब्रँड, उद्योजकांची दिवाळी पहाट, नवं उद्योजक पुरस्कार, अर्थ साक्षर पुरस्कार, डिजिटल इंडिया, अर्थ जिज्ञासा, अर्थवेध असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम त्यांनी अर्थसंकेतच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आयोजित केले व महाराष्ट्रातील दिग्गज उद्योजकांचे व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनी व वृत्तवाहिनी, आकाशवाणी तसेच इतर रेडिओ चॅनेल यांवर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध होत असतात. विविध वर्तमानपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.
श्री बागवे यांचे चारोळी, कविता व ललित लेखावरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.
श्री बागवे यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800