अमेरिका हा एक असा देश आहे, जो जगातील सर्वात शक्तिशाली, सतत चर्चेत असणारा, जग भरच्या लोकांचं आकर्षण असणारा देश आहे. या देशाविषयी अनेक समज, गैर समज आहेत. पण अमेरिकेविषयी एका वेगळ्या दृष्टीकोनातून लिहिताहेत सौ प्रतिभा
आदेश चांदूरकर.
निवृत्त व्यावसायिक असलेल्या चांदूरकर मॅडम बी.कॉम, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट झालेल्या असून शताब्दी महिला सहकारी बँकेच्या स्थापनेसाठी त्यांनी पाच वर्ष व नंतर डायरेक्टर म्हणून पाच त्यांनी काम केले आहे.
स्त्री शक्ती वेल्फेअर असोशिअशन साठी सेक्रेटरी म्हणून पाच वर्ष, टिसा ठाणे स्मॉल स्केल असोसिएशनच्या अनेक उपक्रमात सहभाग, अजेय संस्थेत पदाधिकारी, आम्ही सिद्ध लेखिका ठाणे जिल्हा खजिनदार असे त्यांचे सामाजिक कार्य असून ग्रंथाली प्रकाशनच्या अभिवाचन स्पर्धेत त्यांना बक्षीस मिळाले आहे. निवेदन करायची व लेखनाचीही त्यांना आवड आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात चांदूरकर मॅडम यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
कोविड चा काळ तसा कठीणच..अगदी आठवण ही नको असा..आणि दूर देशात असलेल्या आपल्या मुलाची काळजी, ओढ वाढणं साहजिकच..
आणि मग योग आला माझा आणि माझ्या मिस्टरांचा,
अमेरिका भेटीचा…
अमेरिका किंवा यू एस ला जाताय म्हणलं, की लकी आहात अस सगळं कानावर पडतं. पण परदेशात खूप कष्ट असतात हे मला माहीत होतं..कारण माझे मिस्टर ही एन आर आय आहेत..यू ए ई मध्ये..
परदेश बाहेरून बघायला खूप छान आहे, फिरायला ही खूप छान आहे..पण तिथे प्रचंड कष्ट करणारेच टिकू शकतात..
आपल्याला तिथल्या स्वच्छतेचं, नियम पाळण्याच्या वृत्तीच खूप कौतुक वाटत..ते योग्य आहे..पण हे नियम पाळणारे नागरिक असतात.. तुमच्या, आमच्या सारखे..त्यांच त्यांच्या देशावर प्रेम आहे आणि हे नियम आपल्यासाठी आहेत, हा विश्वास असतो..
आणि देश म्हणजे काय ? तो कशाने बनतो ? तर तिथल्या नागरिकांच्या मुळे..
मग अस असताना काही देश खूप छान, उत्तम तर काही ठीक ठीक , तर काही बेकार..अस नाव का मिळत ?
हे अस नाव आपल्या देशाला का ? असा विचार का येत नाही आपल्या मनात..मग तो कुठल्याही देशाचा नागरिक असो..
बरेचदा बरेच देश त्यांचे आतले प्रॉब्लेम्स लपवतात.. आपल्याकडे लोकशाहीचं प्रचंड स्वातंत्र्य म्हणजे जरा जास्तच आहे, हे ही माझ्या लक्षात आल..
थोडी लोकशाही आवरायला हवी..
अति सोशल मीडियामुळे खर, खोटं काही कळत नाही..
आणि सगळ मिक्स होतं..असो..
तर आमच्या प्रवासाला सुरवात झाली.. अमेरिकेबद्दल बरच ऐकून असतो आपण…मनात थोड कुतूहल आणि उत्कंठा तर होतीच..
आम्ही तीन टप्प्यात प्रवास केला..
मुंबई टू फ्रान्स, फ्रान्स टू अटलांटा, अटलांटा टू लिटिल रॉक असा आमचा प्रवास झाला..प्रवास मात्र फार मोठा आणि दमवणारा आहे..कधी बसून कंटाळा येतो..तर कधी धावपळ करून..परत तीन तीन ठिकाणी लांबलचक इमिग्रेशनच्या लाईनीत उभ रहायचं..
तरी एक गोष्ट मात्र नक्कीच की मुंबई इतकं फास्ट, क्विक काम कुठेही होत नाही..
खरच मुंबई डबल फास्ट आहे, असं तिकडचे ही लोक बोलतात..
तर असा प्रवास करून आम्ही लिटिल रॉक एअर पोर्ट वर पोचलो..लेक आला होता..त्याला भेटुन किती आनंद झाला, हे तर शब्दात सांगू शकत नाही..एअर पोर्ट वरून बाहेर पडलो आणि खूप थंडी…
लेक म्हणत होता आपल्या इकडच्या कपड्यांनी इथली थंडी भागत नाही.. इथे प्रचंड थंडी आहे..
आम्हाला सर्व म्हणत होतेच..की तुम्ही चुकीच्या सिझन ला अमेरिकेत जात आहात..
मुंबईकरांना तर अजिबात थंडीची सवय नाहीच..
तर थंडी म्हणजे काय त्याची हीच प्रचिती..
गाडीत पटकन बसायचं आणि हीटर सुरू करायचा , हा तर रोजचाच भाग झाला. पुढे..दोन तासाच्या प्रवासाने आम्ही कूपर्स पॉइंट ह्या लेकाच्या घरी पोचलो..
रस्त्यात दिवे फार कमी.. घरातले, घरा बाहेरचे दिवे ही खूप डिम ?
अस का ? ह्याच उत्तर तिथे राहिल्यावर मिळालं..
ते पुढच्या भागात…तोवर..
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800