Friday, November 22, 2024
Homeसाहित्यअमेरिका : माझ्या दृष्टीकोनातून ! ( ५ )

अमेरिका : माझ्या दृष्टीकोनातून ! ( ५ )

अमेरिकेचा सर्वात मोठा गुण म्हणजे स्वावलंबन. स्वावलंबन शब्द सर्वांनाच फार आवडतो ह. पण हा आवडणारा शब्द निभावणं सोप्पं नाहीय.

लहान असता तोवर तुमचं कौतुक होते.जसे जसे मोठे होता तुमचे स्वावलंबनाचे धडे गिरवणे, सुरू होते..
तिथल्याच मातीत मोठे झालेल्यांना ते सोप्पं जातं.. उपजत असते अस म्हणा ना.

खर तर महात्मा गांधी ह्यांनी आपल्याला ही शिकवण आधीच दिली. आपण इतका महत्वाचा विषय ही बरेचदा थट्टेचा केला..

पण जो स्वावलंबी असतो ना त्याला कळत, स्वावलंबी असण्याचे सुख..तरुण असतो तोवर हे सगळ ठीक आहे असही वाटते. पण 90 वर्षाची आपल्या घरची आजी, सासू तिला वृध्द म्हणून आपलं जपणं, आणि इथल्या स्त्रिया आणि त्यांच स्वावलंबन पाहिलं, तर कौतुक वाटते आणि कणवही !
तिथे वृध्दाश्रम आहेत. नसेल काहीच काम होत, तर तो पर्याय.
आणि एवढं वय असून काही स्त्रिया पार्ट टाईम काम ही करतात..ते बघून तर खूपच कौतुक वाटले.

मी अमेरिकेत गेले होते, ते दिवस ख्रिसमसचे होते. म्हणून खाऊ घेऊन गेले. सर्व आज्यांना शुभेच्छा देऊन, बार्बारा म्हणून आजी होती, तिच्या घराची बेल वाजवली..तिने आतून उत्तर दिलं, मला उठता येत नाहीये आज, म्हणून मी दार उघडू शकत नाही. थोड्या वेळाने बरे वाटले की मी डॉक्टरकडे जाऊन येईन.

बरे..ती स्वतः गाडी चालवत डॉक्टरकडे जाणार. तिथे बसणार. तिथे सर्व काम स्लो असते. मुंबईकर तर सदैव घाईत. त्याला तर कधी एकदा काम संपते ह्याची घाई.
तुम्हाला कितीही वेदना होत असू देत, त्रास होत असू दे, पेशन्स शब्द शिकायला तिथे जाच.

आता म्हणाल की इमर्जन्सी नसेल का ? आहे ना हो. पण दाम दुप्पट महाग. सर्वच श्रीमंत नाहीत.
आमच्या आसपास राहणाऱ्या ज्या वृध्द स्त्रिया होत्या त्या त्यांच्याकडे असलेल्या पैशात कुठे नीट राहता येईल, असा विचार करून रहात होत्या..
जसे आपण गावी जाऊन राहतो, कारण तिथे राहणे परवडते. तसंच.

आपल्याकडे डॉक्टर व्हिझिटला येतात. तेही घेतात जास्त पैसे, तरी परवडते. तिथे तर आधी फोन, डॉक्टरची वेळ घेणं, सगळेच सोपस्कार.
खरे तर मेडिकल ही किती गरजेची गोष्ट आहे ? देश
कुठलाही असो.
ती सिस्टीम पटकन आणि परवडेल अश्या दरात हवी.

तिथे आधुनिक यंत्रणा, वॉर्डबॉय, नर्स आणि इतरही काम करणारे आहेत त्यांना चांगला पगार आहे. म्हणून असेल मेडिकलचा खर्च जास्त आहे असे वाटते..आपला जीव धोक्यात टाकून हे सर्व आपल्याला मदत करतात, ह्याची जाणीवही आहे.. त्या बद्दल ऋणीही आहेत..

आपल्याकडे ही जाणीव कमी वाटते. तिथेही असतील काही अपवाद, तरी प्रामाणिकपणा जास्त वाटला आपल्यापेक्षा. तिथे मदतीचं मोलच अनमोल आहे.
आपल्याकडे कामाचं आणि योग्य मोबदला मिळणे ह्या दोन्हींच महत्व कमीच आहे. ते गुण आपण घेतले पाहिजेत.

आपल्या देशात सरकारी दवाखान्यात काम करणं मोठं दिव्य आहे. किती अस्वच्छता आहे. तिथेच नाही, सगळीकडे.. आपला देश ह्यासाठी तरी जाणला जाऊ नये, आता असे फार मनापासून वाटते.

आपल्या देशात तर रस्त्यावर विधी करणे, थुंकणे सर्रास चालते.
इथे भारत माता की जय असे म्हणायचं. खरं सांगते आपल्याकडे देशप्रेम बोलण्यासाठी वाटते मला. खरे देशप्रेम त्यांचंच आणि ते बघून आपले काहीच प्रेम नाही आपल्या देशावर असे वाटते.

आता म्हणाल का ?
तर आपल्या देशातल्या नियम न पाळणाऱ्या, चुका करणाऱ्या नागरिकाला आपण स्पष्ट शब्दात न बोलता, कोण बोलणार असे म्हणत घाबरत रहातो..तो जणू मी कसे ही वागलो तरी चालते, कोण काय करतो ? ह्या थाटात असतो.

तिकडे, अमेरिकेत लोक त्याच्याकडे अश्या नजरेने बघतात की त्याला ते अपमानित वाटते..अर्थात इथे तेही वाटणार नाही ह्याची खात्री आहे..
तरी आता सुरवात केली पाहिजे आपण. एकत्र आलो तर सर्व शक्य आहे..
काही असो. नागरिकांचे उत्तम आरोग्य हीच सर्व देशांची संपत्ती आहे हे लक्षात घ्यायला हवे.

दुसरे असे की स्त्रिया वय सांगत नाहीत, असे तिकडे काही नाही. मी इतकी वर्षाची आहे, मला दोन मुलं आहेत वगैरे सर्व सांगत होते.

मला भेटल्या त्या आज्या एकट्याच होत्या. कोणाचे मिस्टर एक वर्षापूर्वी गेले, कोणाचे तीन, चार तर काहींचे दहा, बारा वर्षापूर्वी गेले होते.

एकटीने सर्व समर्थपणे करतात, हे बघून मी त्यांच खूप कौतुक केलं. त्यांना बोलले की इंडियातही काही स्त्रिया अश्या राहतात.
काही एकत्र कुटुंबात ही. जसं पटत असेल तसं. तरी आपल्याकडे मदत ही व्यवस्था आहेच. मी त्यांना सांगून आले, ह्या रूममध्ये माझा लेक आणि त्याचा मित्र राहतो. त्यांना बोलवा हक्काने !
काही झालं तरी आपल्यातली भारतीय आई सोडायची नाही.
ही मदत श्यामची आई पासून सुरू आहे आपल्या देशात..
हो ना..?
क्रमशः

प्रतिभा चांदूरकर

– लेखन : प्रतिभा चांदुरकर. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments