शिक्षणामुळे मनुष्य घडतो
संस्कारामुळे अधिकच खुलतो
शिक्षणामुळे उत्तम प्रगती होते
संस्कारामुळे सामाजिक कार्याला गती येते
शिक्षणामुळे बिकट परिस्थिती वर मात करतो
संस्कारामुळे इतरांनाही मदतीचा हात देतो
शिक्षणामुळे आयुष्य स्थिर स्थावर होते
संस्कारामुळे समाधानी जीवन जगता येते
शिक्षणामुळे मान सन्मान मिळतो
संस्कारामुळे गर्व अथवा अहंकार नसतो
शिक्षणामुळे समाजात मोठेपणा मिळतो
संस्कारामुळे कामात खोटेपणा नसतो
शिक्षणामुळे पैसा संपत्ती मिळते
संस्कारामुळे त्याच्यातील माणुसकी टिकते
शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो
संस्कारामुळे विश्वासाने जग जिंकतो
शिक्षणामुळे सत्ता हाती येते
संस्कारामुळे त्याची मस्ती नसते
शिक्षणामुळे पद प्रतिष्ठा प्राप्त होते
संस्कारामुळे त्याचा गैरवापर नसतो
शिक्षणामुळे त्याचे कर्तृत्व झळकते
संस्कारामुळे प्रभावी व्यक्तिमत्व लाभते
शिक्षणामुळे तो हुशारीने व्यवहार करतो
संस्कारामुळे कोणताही भ्रष्टाचार नसतो
शिक्षणामुळे शहाणपण येते
संस्कारामुळे ते नम्रपणे जपले जाते
शिक्षणामुळे प्रसिद्धी मिळते
संस्कारामुळे मानसिक स्थिती उत्तम रहाते
शिक्षणाला संस्काराची जोड असली
की तो सर्वांसाठी आदर्श ठरतो
की तो खऱ्यार्थाने परिपूर्ण होतो.
– रचना : रश्मी हेडे.
कविता न वाटता सुविचार लिहिल्यासारखे वाटतात.
शिक्षणामुळे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यावरचा विश्वास वाढतो.शिक्षणामुळे माणूस अंधश्रद्धा सोडून चिकित्सक बनतो… शिक्षणामुळे माणूस स्वतःच्या होणाऱ्या पिळवणूक किंवा आर्थिक फसवणुकीपासून सावध होतो…
छान काव्यरचना अभिनंदन मॅडम