अर्जेंटिना राष्ट्र आणि एनएफडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्जेंटिना फिल्म फेस्टिवल मुंबई स्थित, एनएमआयसी परिसरात आयोजित करण्यात आला असून नुकताच विविध राष्ट्र प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ करण्यात आला.
अर्जेंटिना राष्ट्राचे काउन्सिल जनरल महामहीम डॅनिएल, एनएफडीसी जी.एम., श्री डी राम, विवेक वासवानी, डॉली ठाकूर, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन तथा संबोधन पश्चात अर्जेंटिना चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
व्हिजन इंडिया अध्यक्ष स्वप्नील राणी नंदकुमार, डॉ सुरेना मल्होत्रा, निलेश मल्होत्रा, सुधा शेट्टी, विलास देवळेकर, सुनीता काटकर, शशिकांत सावंत, रेवती आळवे या प्रसंगी प्रमुख उपस्थित होते.
हर्नान ओहाको आणि शेफाली यांच्याद्वारे, टांगो या अर्जेंटिना नृत्य आविष्कारने तथा हिरामंडी कलाकार ताह शाह बदुशा यांच्या मुलाखतीने सोहळ्यास विशेष रंग आला. कु जयिता घोष यांच्या अथक परिश्रम पश्चात आयोजित सदर फिल्म फेस्टिवल पुढील ५ दिवस असेल.
— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800