“अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट” हा कार्यक्रम नुकताच मुंबईत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री शंतनू भडकमकर, विकोचे श्री संजीव पेंढारकर, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे उपस्थित होते.
या वेळी बोलताना, श्री संजीव पेंढारकर म्हणाले की,
संकल्पाला मेहनतीची जोड मिळाल्यास कार्य निश्चितच सिद्धीला पोहोचते.
तर अपयशाला न घाबरता सातत्याने वाटचाल करणे आवश्यक असून कोणतेही काम करताना काय संकेत मिळत आहेत ते लक्षात घेणे आवश्यक असते, असे विचार श्री शंतनू भडकमकर यांनी व्यक्त केले.
अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना लचके बागवे यांच्या ‘सप्तरंग उद्योजकतेचे’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
‘लालबागचा राजा’ व ‘मुंबईचा राजा, गणेशगल्ली, मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर श्री प्रीतम वैद्य, हेडहंटर श्री गिरीश टिळक, श्री राजेश विनायक कदम व झोई फिनटेक यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
जेष्ठ मूर्तिकार श्री मनोहर बागवे यांच्या कार्याचा इंजि. डॉ. माधवराव भिडे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कोणतेही काम सुरु करण्या अगोदर आपण श्री गणेशाची पूजा करतो आणि म्हणूनच यंदा ‘प्रारंभ’ या थीम अंतर्गत विविध गणेश उत्सव मंडळांचे व्यवस्थापन आणि त्यांचे समाजाप्रती केले जाणारे उपक्रम हा विषय घेण्यात आला होता.
गणेश मंडळे गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. समाजाला एकत्रित आणणे आणि समाजाच्या प्रती सामाजिक काम करणे हे कार्य ते अविरतपणे करत असतात. मुंबईतील १० सेवाभावी गणेशमंडळांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
– टीम एनएसटी. ☎️ +919869484800