Thursday, November 21, 2024

अलगुज

सावळा सुंदर दिसतो मुरलीमनोहर
रुप निळे लोंभस दावितो रुक्मिणीवर

वेणुतून विहरती स्वर स्वर्गीय सुस्वर
यमुनेच्या अंगी तरंग मोहक थरथर

त्याची नाजुक बोटे फिरती अलवार
स्वरनाद लपेटे गोकुळी भामावर

पावरीचा नाद घुमे समरसून गोकुळी
गोप गोपिका उभे तल्लीन यमुनाजळी

मस्तकीचे मोरपीस किंचित लवून ऐके
स्वर लय प्राण एक सारेच झाले मुके

नाद गुंजतो गोकुळी तरुवर झाले निःशब्द
कृष्ण स्वर ऐकुनी विश्व अवघे झाले धुंद

शिल्पा कुलकर्णी

– रचना : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments