दक्षिण आफ्रिकेत 97 वी कॉम्रेड्स मॅरेथॉन रविवार 9 जून 2024 ला झाली. ही एक मॅरेथॉन आहे जी धावण्याचे प्रत्येक धावपटूचे स्वप्न असते.
त्यात विरार येथील ४५ वर्षांचे प्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ. अमित सामंत यांनी भाग घेतला. त्यांनी 86 किलोमीटर अंतर
10 तास 32 मिनिटात पूर्ण केले. यात 50 किलोमीटरचा चढ होता.
डर्बन ते पीटरमारिट्झबर्ग मॅरेथॉनमध्ये जगातील २० हजार लोकांनी भाग घेतला. डॉ अमित सामंत यांच्या यशाचा भारताला अभिमान आहे.
अर्थात डॉ. अमित सामंत यांना हे यश सहजासहजी मिळाले नाही. यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. ते रोज पहाटे धावायला जातात. चालणे आणि धावणे हा त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला आहे .
डॉ. अमित सामंत यांचा हा आदर्श आपण ही सर्वांनी अंगिकारू या.
— लेखन : डॉ.हेमंत जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800