उस्मानाबाद जिल्ह्यातील काटी येथील जि.प.प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल अविस्मरणीय ठरली.
ही सहल रामलिंग येडशी येथे काढण्यात आली. निसर्गरम्य वातावरण, धबधबा, गुहा, झाडी, पशुप्राणी यामुळे विद्यार्थ्यांच्या मनोरंजना बरोबरच त्यांच्या ज्ञानात चांगलीच भर पडली.
गडदेवधानोरी व उस्मानाबाद दर्गा येथे पण विद्यार्थ्यांनी भेट दिली. यामुळे सहिष्णुता वाढुन धार्मिक सदभावना विद्यार्थ्यास वाढिस लागण्यास मदत होईल.
हातलाई डोंगर, दरी, झाडी, निसर्गरम्य वातावरण यामुळे विद्यार्थी अधिकच आनंदी झाले. उस्मानाबाद शहराची कुलदैवता धारासुर मर्दीनी या देवीचे दर्शन घेतल्यामुळे मुले अधिक उत्साही बनली. तर वडगाव सिध्देश्वर येथील महादेव मंदिरास भेट देऊन विद्यार्थी भक्तीरसात तल्लीन झाले.
येताना मुदगुलेश्वर मंदिर पाहुन विद्यार्थी धार्मिकदृष्टया सजग झाले. आनंदी, उत्साही वातावरणात ही सहल संपन्न झाली.
मुख्याध्यापक सत्यवान रसाळ तर दैवशाला कांबळे मॅडम यांनी सहलीसाठी सहकार्य केले. सहलीचे नियोजन, यशस्वी आयोजन आणि अंमलबजावणी सहल प्रमुख श्री.पंकज काटकर सर यांनी प्रामाणिकपणे पार पाडली.
या सहली विषयीचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आपल्या बालपणात घेऊन जाईल याची खात्री आहे.
या सुंदर व्हिडिओचे छायाचित्रण श्री.पंकज काटकर यांनी, संकलन श्री.सत्यवान रसाळ मुख्याध्यापक यांनी तर निवेदन श्री.चंद्रसेन पंखे यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800