मैत्रीण हवी दारावरील उंबरठयासारखी ,
दुःख अडवून ह्रुदयी लावण्यासारखी ॥
मैत्रीण हवी गोठ्यातील गाईसारखी ,
मनाला बिलगून चाटणाऱ्या वासरासारखी ॥
मैत्रीण हवी लुकलुकणाऱ्या चांदण्या सारखी ,
अमावास्येला चंद्राला अवकाशात लपवण्यासारखी ॥
मैत्रीण हवी तटस्थ झाडासारखी ,
रणरणत्या उन्हाळ्यात सावलीच्या गारव्यासारखी ॥
मैत्रीण हवी डोळ्यात राहण्यासारखी ,
काजळ होऊन तीट लावण्यासारखी ॥
मैत्रीण हवी सुगंधित फुलासारखी ,
बंद कुपीतल्या आनंदी मनासारखी ॥
मैत्रीण हवी सतत वाचण्यासारखी ,
पाने चाळताना भूतकाळी आठवणीसारखी ॥
मैत्रीण हवी धनुष्य तीरासारखी ,
मनातील भावनांना अचूक ओळखण्यासारखी ॥
– रचना : सौ. वर्षा भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खरोखरच मैत्रिणीचे वेगवेगळे पैलू तू इथे उलगडत छान कविता रचलीस आणि अशीच एक तुझ्यासारखी मैत्रिण आम्हाला लाभली याचा आम्हाला अभिमान वाटतो.
खुप सुंदर
खूप सुंदर
खूप छान कविता वर्षा मॅडम (मावशी )…….. 👌🏻👌🏻
वर्षा अशाच कविता करत रहा .खूप छान खूप शुभेच्छा 👌👌
Wishing everyone has good friends as written in poem. Good poem on friendship.
Khup chaan decribe Kelay kavita madhye
खूप छान कविता, आज पर्यंत मित्रांवर सुरेख भाष्य करणारे लेख, कविता खूप वाचल्या आणि ऐकल्यासुद्धा…पण मैत्रिणीवर केलेल्या कविता आणि लेख क्वचितच वाचायला आणि ऐकायला मिळतात…
मोरपिसाच्या हळुवार स्पर्शाने जसे अंग मोहरून जाते ना, अगदी तसेच आज तुमच्या या कवितेत दाखविलेल्या मैत्रिण या शब्दाबद्दलच्या विविध छटांनी मन अगदी मोहरून गेले…
वर्षा मॅडम, असेच नवनवीन लेख आणि कविता करीत रहा..
तुमच्या कविता आणि लेख वाचताना तुमच्या सहवासाची, मायेची ऊब नेहमी जाणवते…आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो..We all love u..Varsha Madam
👌👌👌