साडीतली आई मला हवी,
जीन्स टी शर्ट घातलेली नको आई,
मांडीवर तिच्या डोकं ठेवताना,
साडीच्या उबेत माय सजावी ॥
मोबाईल व्यसनमुक्त आई हवी,
किटी पार्टीतली नको आई,
चविष्ट पदार्थ जिभेवर विरघळताना,
घरंदाज सुगरण नारी शोभावी ॥
रोजच डोळ्यासमोर आई हवी,
कामावर जाणारी नको आई,
दारात येताच तिला पाहताना,
थकवा विसरून प्रसन्नता भासावी ॥
वेणीत फूल लावणारी आई हवी,
मोकळ्या केसातील नको आई,
फुलाचा सुगंध घरभर पसरताना,
आई जाणीव उमटत राहावी ॥
सालस गुणी आई हवी,
चिडून भांडणारी नको आई,
प्रेमाच्या साखळीत घराला बांधताना,
लक्ष्मी सरस्वती रूपात दिसावी ॥
– रचना : सौ. वर्षा भाबल.
Thank you so much Varsha madam ,mother is mother .We should always honour her ,My mother is or your mother is mother ,no differ at all .difference is always there still mother is mother because of her I or we are here on earth another mother .Well express your thoughts .great Varsha madam
उत्तम❤️❤️
Khup chan
🌹आई या नावातच सर्व काही आलं.
किती सोप्या भाषेत वर्णन केलं आहे. परंतु अर्थ खूप खोल आहे. आजच्या जगात वेळ नाही बाकी सर्व आहे.
कुटुंबातील संवाद कमी झालेत 🌹
सौं वर्षा भाबल धन्यवाद 🌹🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
छान छान..!