Home बातम्या अशोक जालनावाला यांना आदरांजली

अशोक जालनावाला यांना आदरांजली

0

नवी मुंबईचे आद्य पत्रकार अशी ओळख असलेले, लोकप्रिय पत्रकार अशोक जालनावाला यांचे २३ जून २०२० रोजी निधन झाले. त्यावेळी व गेल्या वर्षीही कोरोना प्रतिबंधांमुळे त्यांना जाहीर श्रद्धांजली अर्पण करता आली नाही. म्हणून त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्त काल वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात त्यांच्या कुटुंबीयांनी आदरांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर,निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, पत्रकार सर्वश्री हेमंत जुवेकर, जयेश सामंत, नारायण जाधव, विकास महाडिक, कांतीलाल कडू, पुत्र निलेश जालनावाला आदींनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून त्यांची गुणविशेष विशद करणारी भाषणे केली. पुत्र तथा पत्रकार मनोज जालनावाला यांनी आभार प्रदर्शन केले.

या सभेस विविध मान्यवर, चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंडित संजीव अभ्यंकर यांच्या सुश्राव्य गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

या कार्यक्रमाचा संपूर्ण वृत्तान्त आपण पुढील लिंक वर पाहू शकता.

https://youtu.be/GSKpsZh5X3M

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version