कला, साहित्य, संस्कृतीची जोपासना करण्यासाठी नवी मुंबईत गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या “नवरंग” संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त नाते संबंध या थीम वर आधारित ३ सुंदर, आशयपूर्ण एकांकिका नुकत्याच सादर करण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरवात झाली.
प्रतिभा सराफ यांच्या कथेवर आधारीत,घनश्याम परकाले लिखित ‘नाती’ ही जेष्ठ नागरिकांच्या भाव भावनांवर आधारित पहिली एकांकिका ‘स्टर्लिग काॅलेज च्या’ विद्यार्थ्यांनी सादर केली. तरूण तरुणींनी जेष्ठ नागरिकांच्या व्यथा सशक्त अभिनयातून साकार केल्याने प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
दुसरी एकांकिका, अनिल मुनघाटे लिखित ‘महानंदा’ ही एका प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात काम करणा-या विधवा स्त्रीची मानसिक, भावनिक, लैंगिक व्यथा मांडणारी होती. यात सर्वच कलाकार पोक्त असल्याने सर्वांच्या भूमिका कसदार झाल्या.
तिसरी एकांकिका, रविंद्र वाडकर लिखित ‘निळे आकाश, निळे स्वप्न’ ही आशयघन कलाकृती सादर झाली. या एकांकिकेत दोनच पात्रे असूनही ती दोन्ही कलाकारांनी जीवंत अभिनयाने सादर केली.
या तीनही एकांकिकेत प्रकाश योजना, ध्वनी, पार्श्वसंगीत, मेकप, नेपथ्य बॅक स्टेज कलाकारांनी उत्तम सादर केली.
संस्थेच्यावतीने सर्व कलाकारांचे पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा देशमुख यांनी उत्कृष्ट केले.
हा वर्धापनदिन सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष गज आनन म्हात्रे, उपाध्यक्ष अनिल मुनघाटे, सचिव घनश्याम परकाले, खजिनदार पाकिजा आत्तार, सदस्य सर्वश्री शामराव सुतार, विलास राजुरकर, नवदुर्गा पवार, अनिता मुनघाटे, रविंद्र वाडकर, दुर्गा देशमुख यांनी खुप मेहनत घेतली.
दिपाली जाधव यांनी प्रवेश द्वाराजवळ काढलेली मनमोहक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती.
या प्रसंगी नाटककार एल.बी.पाटील, जेष्ठ नाट्यकर्मी रामभाऊ पाटील, नामवंत साहित्यिका प्रतिभा सराफ, प्रा.अजित मगदुम, मराठी साहित्य, संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, गझलकार आप्पा ठाकुर, नाट्य दिग्दर्शक रवी वाडकर, महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागाचे निवृत्त संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक सर्वश्री देवेंद्र भुजबळ, न.मु.म.पा. मुख्य जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, जेष्ठ पत्रकार राजेंद्र घरत ,सेवाधारी जेष्ठ नागरिक संघाचे अशोक कुंडे, सिताराम रोकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
या कार्यक्रमात तिन्ही एकांकिका वैशिष्ट्यपूर्ण होत्या त्या उत्तम रीतीने सादर करण्यात आल्या.