साकव्य पुणे विभागाने नुकतेच आयोजित केलेले तिसरे साहित्यिक संमेलन नुकतेच अतिशय उत्साहात पार पडले. श्री. नंदकिशोर बोधाई यांनी याचे सर्व आयोजन केले होते.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भूषविले. प्रा. नंदकिशोर बोधाई यांनी प्रास्ताविक केले. श्री. सुहास सांबरे यांनी स्वागत केले. श्री. शरद जतकर यांनी ईशस्तवन केले. आघाडीच्या कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांनी अत्यंत प्रभावीपणे सूत्रसंचालन केले.
या संमेलनात २५ कवी, कवयित्री यांनी काव्य संमेलन गाजवले. यामध्ये चंद्रशेखर धर्माधिकारी, राजश्री सोले, कीर्ति देसाई, मेघना आगवेकर, गणपत तरंगे, उषा फाल्गुने, सारिका सासवडे, किसन म्हसे, विजय जाधव, बाळकृष्ण अमृतकर, विनया साठे, नंदिनी चांदवले , हेमांगी बोंडे, शोभा जुमडे, अनघा कुलकर्णी, उमा व्यास, डि.के जोशी, नंदकिशोर बोधाई, ज्योत्स्ना तानवडे आदि सहभागी होते..
प्रिया दामले यांनी ‘वहातो ही दूर्वाची जुडी’ मधील काव्य सादर करुन संमेलनाची रंगत वाढवली. या संमेलनात साहित्य आणि सामाजिक बांधिलकी या महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. काही सूचना, प्रस्ताव मांडले गेले. दर ३ महिन्यांनी असा मेळावा घ्यावा, समुहात १ आणि १५ अशा ठराविक तारखांना काव्य स्पर्धा घ्याव्यात, या साहित्यिक वाटचालीत जास्तीत जास्त तरूणांना सहभागी करून घ्यावे अशा खूप चांगल्या सूचना आल्या.
संमेलनाचे औचित्य साधून संमेलनाध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित “डहाळी विशेषांक” मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. तसेच कीर्ति देसाई यांचा ‘स्वरसुगंध’ हा स्वरचित गीतांचा संग्रह डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आला.
समारोपात संमेलनाध्यक्ष डाॅ.घाणेकर यांनी त्यांच्या ब्रम्हध्यान विश्वपीठातर्फे, ‘साकव्य’ चे संस्थापक आणि अध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी यांना २०२४ चा ‘साहित्य जीवन गौरव’ पुरस्कार जाहिर केला. अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी अध्यक्षीय भाषणात विचार प्रवर्तक मार्गदर्शन केले.
या संमेलनात सहभागी झालेल्या काही सदस्यांनी खूप छान प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी एक विडंबन गीत, तर सुहास सांबरे यांनी एक गीत सादर केले. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रा.नंदकिशोर बोधाई, सुहास सांबरे, चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्योत्स्ना तानवडे यांच्या विशेष सक्रीय पुढाकारातून संमेलन अपेक्षेपेक्षाही यशस्वी झाले.
— लेखन : ज्योत्स्ना तानवडे.
पुणे साकव्य मेळावा सदस्य.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800