सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी “न्यूज स्टोरी टुडे” या आपल्या वेबपोर्टल तर्फे एक छोटेखानी कौटुंबिक स्नेहमिलन ठाण्यात श्री हेमंत साने व सौ मेघना साने यांच्या घरी आयोजित केलं होतं.
‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक श्री. देवेंद्र भुजबळ आणि निर्मात्या अलका भुजबळ, सह्याद्री वाहिनीचे निवृत्त अधिकारी श्री. नितीन केळकर, राम खाकाळ, डॉ. उल्हास वाघ, भूपेंद्र मिस्त्री, फोटोग्राफर समीर, ठाणे वैभव चे संपादक श्री. मिलिंद बल्लाळ, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, वृत्त निवेदिका वासंती वर्तक, कवी विकास भावे, डॉ.मीना बर्दापूरकर, डॉ. अंजुषा पाटील, आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या पदाधिकारी प्रतिभा चांदुरकर आणि अस्मिता चौधरी तसेच नेहा हजारे, को. म. सा. प. च्या ज्योती कपिले, आर जे जाधव इत्यादी हजर होते.
या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहणाऱ्या लेखिका व कॅन्सर संशोधक डॉ. सुलोचना गवांदे यांची मुलाखत मेघना साने यांनी घेतली. या नंतर प्रेक्षकांनीही त्यांना प्रश्न विचारले. या कार्यक्रमाची छानशी डॉक्युमेंटरी तयार केली. चहापान करता करता, चर्चा ओळखी होऊन आनंददायी अशा वातावरणात हे संमेलन संपन्न बहरले.
यावेळी डॉ सुलोचना गवांदे आणि साने दांपत्यास ‘न्युज स्टोरी टुडे’ पोर्टल वर प्रसिध्द झालेल्या लेखमालांची पुस्तके, जीवन प्रवास, समाजभूषण, मी पोलीस अधिकारी, भेट देण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन मेघना साने आणि हेमंत साने यांनी खूप मेहनत घेऊन आपल्या निवासस्थानी केले होते तर श्री भूपेंद्र मिस्त्री यांनी या कार्यक्रमाची छानशी डॉक्युमेंटरी तयार केली.
जमलेली सर्व मंडळी समविचारी असून आता या स्नेहमिलनाच्या निमित्ताने एकमेकांशी जोडले गेले आहेत.
— लेखन : डॉ अंजुषा पाटील. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800