नुसता शब्द नव्हे हा आई,
प्रेमळ हृदय, करुणामय ती आई,
मातृत्वाचे लेणे लेऊन
बाळाला कडेवर घेऊन
चिऊ, काऊ चा घास भरून,
बाळा वीण तिज सुचेना काही
असते फक्त तीच आई,
बाळाला सांभाळीत ती करते सर्वांचा आदर
कामासाठी गाडीत चढताना सांभाळीत पदर,
तान्हुळ्याची भूक भागविन्यास
सारिते बाजुला तोच पदर
असते फक्त तीच आई,
बालपणी ती हात देई
तरुणपणी ती साथ देई
रणांगणी ती स्फुरण देई,
वाढविण्या मुला, मायेचे पाश तोडी,
संकट समयी आधार देई,
असते फक्त तीच आई
असते फक्त तीच आई.

— रचना : सौ सुजाता सातालकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 91 9869484800

छान कविता सुजाता साताळकर ह्यांची 👌🏻👌🏻