दर वर्षी ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा होत असतो. त्यानुसार आपणही हा दिन साजरा करीत असतो.
छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या मासाहेब जिजाऊ, रणरागिणी होऊन संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्रीयांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि मातृत्व, नेतृत्व तसेच कर्तृत्वाने मानवतेची ज्योत पेटती ठेवणाऱ्या सर्व महिलांना या जागतिक महिला दिनी माझा मानाचा मुजरा.
आईच्या आभाळभर मायेला शुभेच्छा
बहिणीच्या निरागस छायेला शुभेच्छा
मैत्रिणीच्या मनातल्या विश्वासाला शुभेच्छा. पत्नीच्या जन्मभराच्या प्रवासाला शुभेच्छा
आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा
लेकीच्या बोबड्या गाण्याला शुभेच्छा
पृथ्वीवरील स्वर्गाच्या वारीला शुभेच्छा
जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा.
८ मार्च १९०८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योगातील हजारो स्रीयांनी जमून कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादि मागण्या केल्या व निदर्शने केली.स्रीयांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता. सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व तो पासही झाला. तेव्हा पासून हा दिवस महिला दिंन म्हणून साजरा केला जातो.
आजच्या युगात महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने फार मोठे महत्वाचे व मानाचे स्थान प्राप्त केलेले आहे. आजच्या तंत्रज्ञान युगात औद्योगिक क्रांती झाली या क्षेत्रात व ग्रामीण भागातील क्षेत्रातही महिलांचा सिंहाचा वाटा आहे.ग्रामीण भागात स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे. आजही ग्रामीण भागात स्त्रिया कष्टाळू असून पुरुषांप्रमाणे संस्कृतीत घरातील स्वयंपाकासह धुणीभांडी, मुलांचे संगोपन इत्यादी अनेक कामे सांभाळून शेती व्यवसायातही बरीचशी कामे सतत करीत असतात.
आज महिलांनी आपल्या कर्तृत्वावर विविध क्षेत्र काबीज केलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांचा शिरकाव झालेला आहे. महिलांनी मनावर घेतले तर कोणतेही क्षेत्र यशस्वीपणे काबीज करू शकतात. हे महिलांनी अनेकदा सिद्ध करून दाखविले आहे.शेती, उद्योग, शिक्षणाचा प्रसार – प्रचार याशिवाय पुरुषाचा सहभागही महिलांना सक्षमतेकडे नेऊ शकतो. स्त्री ही कष्टाने परिस्थिती बदलवू शकते. तीच सुसंस्काराची नवी पिढी निर्माण करू शकते. ती एक महान तपस्वी असून कुणी कन्या, कुणाची माता, कुणाची भगिनी, कुणाची पत्नी इत्यादी पवित्र नातेसंबंधातील महत्त्वाची शृंखला असून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक प्रेरणास्रोत निर्माण करते.
आजही म्हणतात, जिचे हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी.घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी म्हणूनच संपूर्ण परिवाराची कुटुंब व्यवस्था तीच पाहते.
विशेषत: ग्रामीण भागात रानवनातून जळाऊ लाकूड, पाणी दूध तसेच किराणा, बाजार, दळण, नित्योपयोगी दैनंदिन घरकमे करून शेतावर जाणे, मजुरी करणे इ अनेक उपक्रम सांभाळत उदरनिर्वाहा करिता स्त्रियांना अमाप कष्ट सोसावे लागतात. शासन राबवित असलेल्या महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना शासन मोठ्या प्रमाणात राबवित आहे. स्त्री सक्षीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल आहे.
— लेखन : एस.के. बावस्कर.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
घरातील स्त्रिया कर्तबगार राहिल्यात तर संपूर्ण कुटुंब प्रगती करतं सुंदर लेख आहे.
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.