धन्वंतरीची पूजा करावी या दिवशी
निरोगी राहील जीव भूवरी
विश्वाचा तो परमात्मा असे जरी
लाडक्या लेकरास दिली
तु मोठी जबाबदारी
महामारीचा काळ होता जरी
नाही घाबरलो आम्ही तरी
विश्वास होता तुझ्यावरी अन
तुझा आशिष होता आमच्यावरी
दवाखान्यात राबत होतास जरी
हॉस्पिटलात तुडुंब गर्दी
डॉक्टर नर्स आदींच्या रुपात
सेवा करत होतास चारही प्रहरी
जे गेले त्यांची उणीव
भासत राहील आयुष्यभरी
अन जे तारून आले त्यांची
काळजी घ्यावी नित्यपरी
रोज व्यायाम योगासने करुनी
पथ्य अपथ्य पाळावे जीवनी
सुख समाधानाने जगुनी
समाजाचे ऋण फेडावे
आयुष्य लावावे सत्कारणी
निरोगी निस्वार्थ भाव जये ठिकाणी
सुख समृद्धी अन लक्ष्मी नांदेल तये स्थानी

– रचना : सौ. मंजुषा राजेश किवडे