Friday, October 17, 2025
Homeलेखआज "डॉक्टर्स डे" का ?

आज “डॉक्टर्स डे” का ?

जागतिक किर्तीचे डॉ बिधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. ते स्वातंत्र्य सैनिक होते. ते तीन वर्ष कलकत्ता महानगर पालिकेचे महापौर होते. 1947 ला त्यांना उत्तरप्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते परंतु त्यांनी त्या पदाचा स्विकार केला नाही. त्यानंतर ते 14 जानेवारी 1948 पासून सलग चौदा वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना सुध्दा ते रोज दोन तास मोफत रुग्ण तपासत असत.

त्यांनी राजकारणाबरोबर वैद्यकीय क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले त्याची दाखल घेऊन केंद्र सरकारने 1961 साली त्यांना “भारतरत्न” देऊन सन्मान केला. अशा या अष्टपैलू व्यक्तीचे 1 जुलै 1962 रोजी निधन झाले. निधनानंतर त्यांचा पश्चिम बंगालच्या विधान भवनाच्या आवारात भव्य पुतळा उभारण्यात आला. 1982 साली त्यांचे पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले.

डॉ बिधान चंद्र रॉय यांचे राजकरण, समाजकारण याच बरोबर वैद्यकीय क्षेत्रांतील योगदानाचे स्मरण रहावे म्हणून त्यांचा 1 जुलै हा स्मृतीदिन तसेच जन्मदिन “डॉक्टर्स डे” म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.

डॉक्टर्स डे
पंचवीस – तीस वर्षापूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती. त्यानंतर लहान मुलांचा डॉक्टर, महिलांचा डॉक्टर इतकेच काय वेगवेळ्या आजाराचे वेगवेगळे डॉक्टर झाले. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बुध्धिमत्ता तर लागतेच परंतु डॉक्टर होईपर्यंत करोडो रुपये खर्च करावे लागतात. त्यातून हॉस्पिटल उभारायचे झाले तर डॉक्टरांना कर्जबाजारी व्हावे लागते.

प्रत्येक डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते हे विश्वासावर अवलंबून असते. या विश्वासाला पात्र होण्याचा प्रयत्न प्रत्येक डॉक्टर करत असतो. परंतु थोडे फार डॉक्टर रूग्णांकडून अनावश्यक तपासण्या करून घेणे, आवश्यकतेपेक्षा जास्त औषध लिहून देणे इत्यादी मार्गाने फसवणूक करतात. त्यामुळे डॉक्टर व रुग्ण यांच्यात अविश्वासाची दरी निर्माण होत आहे. त्यातूनच एखादा रुग्ण दगावला तर डॉक्टरला मारहाण करणे, मोडतोड करणे इत्यादी घटना घडत असतात.

अनेक ठिकाणी डॉक्टर रुग्णांशी चांगले वर्तन करतात. परंतु नर्स, इत्यादी कर्मचारी उध्धटपणे वागतात त्यामुळे सुध्दा वादंग होतात. वादंग टाळायचे असतील तर डॉक्टर, रुग्ण दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे. प्रत्येक डॉक्टरला डॉ बिधान चंद्र रॉय यांच्या सारखे बनता आले नाही तरी चालेल परंतु रुग्णमित्र बनावे ही डॉक्टर्स डे निमित्त अपेक्षा.

डॉक्टर दिनानिमित्त सर्व डॉक्टर्सना खुप खुप शुभेच्छा.

दिलीप गडकरी

– लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. Doctors day निमित्त खूप सुंदर माहितीपूर्ण लेख👌👌
    सर्वच सदर नेहमीप्रमाणे सुरेख👍👍🌹🌹

  2. समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणा-या एका महान डाॅक्टरांना मानवंदना देण्यासाठी डाक्टर डे सुरू झाला ही माहिती देणारा वाचनीय लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप