प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी झाला तर २३ एप्रिल १६१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. योगायोग म्हणजे अनेक जागतिक किर्तीच्या नामवंत कवी, लेखक, यांची पुण्यतिथी अथवा जयंती याच दिवशी येत असल्यामुळे “युनेस्को” ने १५ नोव्हेंबर १९९५ ला पॅरिस येथे झालेल्या परिषदेमध्ये २३ एप्रिल हा दिवस “जागतिक पुस्तक दिवस” म्हणून साजरा करण्याचे ठरवले. २३ एप्रिल १९९६ रोजी पहिला जागतिक पुस्तक दिवस साजरा झाला. पुस्तकांचे महत्व जनमानसावर बिम्बवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो
“पुस्तक आणि वाचन” हेच मनुष्याच्या गतीचा व प्रगतीचा आधार आहे “असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. बाबासाहेबांनी योग्य सांगितले आहे. माणूस अनेक वर्षापासून वाचन करत होता परंतु १८०५ साली मुद्रित करण्यात आलेल्या ‘मराठी व्याकरण ‘या पहिल्या पुस्तकाने मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर खऱ्या अर्थाने माणसाच्या वाचनाची गती वाढली आणि माणसाची प्रगती झाली.
१९ नोव्हेंबर २००७ या दिवशी आधुनिक वाचन संस्कृतीच्या द्रुष्टीने एक महत्वाची घटना घडली. अमेझॉन कम्पनीने त्या दिवशी ‘किंडल’ हे कागदाविना पुस्तक वाचता येईल असे उपकरण बाजारात उपलब्ध केले. या साऱ्या क्रांतीची बिजे ॲडॉबने १९९३ मध्ये तयार केलेल्या पीडीएफ फाईल फॉर्मॉटमध्ये आहेत. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट (पीडीएफ) ची निर्मिती हे ई-बुकच्या दिशेने टाकले गेलेले पहिले पाऊल. पीडीएफचा वापर करून अनेक पुस्तकांच्या डिजिटल आवृत्या काढण्यात आल्या.
कालांतराने नव्या तंत्राने डिजिटल आवृत्यात मोठे बदल झाले. सध्या लेखकाने लिहिलेले पुस्तक दुसऱ्याच क्षणी ई-बुक स्वरुपात उपलब्ध होत आहे. साधारणपणे एका ई-बुक्सच्या एक लाख प्रती प्रसारित करण्यासाठी पाच हजार रुपये खर्च येतो. यामुळे कागदाची बचत होते, छपाईचा त्रास नाही. ईमेलनेच पुस्तक पाठवले जाणार असल्याने जगांत कोठेही वाऱ्याच्या वेगाने ते जाते. ई-बुक्स ऐकता येत असल्याने दृष्टीहिन व्यक्तींनाही त्याचा फायदा होत आहे.
२०१२ अखेर पर्यंत इंग्रजीत साडेचार कोटी ई -बुक्स तयार होती . चीनी, जपानी, भाषेतही मुबलक ई-बुक्स तयार आहेत. भारतात तमीळ, बंगाली भाषा सुध्दा याबाबतीत आघाडीवर आहे. मराठीत नवीन साहित्य डिजिटल स्वरुपात थोड्या प्रमाणात येत आहे परंतु जुने साहित्य लवकरात लवकर डिजिटल स्वरुपात आणणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्वानी शासनाकडे पाठपुरावा केला तर वाचकासाठी माहितीचा मोठा खजिना उपलब्ध होईल यात शंकाच नाही.

– लेखन : दिलीप गडकरी. कर्जत-रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
जागतिक पुस्तक दिनानिमित्त अतिशय माहितीपूर्ण व सुंदर लेख.
दिलिप गडकरींचा जागतिक पुस्तक दिनाचा लेख आवडला. दुर्मिळ माहिती दिली भुजबळ साहेबांनी उपलब्ध करुन दिली धन्यवाद. शुभेच्छा.
श्री. दिलीप गडकरी यांचा माहितीपूर्ण लेख खूप आवडला. मुद्देसूद वर्णन केल आहे. महत्वाचा मुद्दा येथे छान मांडला आहे, तो म्हणजे ई बुक बाबत. खरंच मराठी भाषा या बाबत मागे राहिली आहे. अभिजात दर्जा बद्दल आपण फक्त एक दिवस बोलतो. भाषा दिन किंवा एखादं साहित्य संमेलन, बस. पाठपुरावा होताना दिसत नाहीहे. असो अप्रतिम लेख 🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
🙏ई बुक बाबतीतील मराठी पुस्तकांनी मागे राहून चालणार नाही. वाचकांनी एक आघाडी उभारून शासनाला ह्या निकडीची जाणीव करून देऊन होई पर्यंत पाठपुराव्यासाठी समजमध्यमांचा वापर करून एकत्रित येणे जरुरी आहेच. चला लागा कामाला 🙋♂️… श्रीकांत चव्हाण
दिलीप गडकरी यांचा लेख जसा माहितीपूर्ण आहे तसाच वाचनीय आहे.पुस्तक दिनानिमित्त प्रकाशन क्षेत्रातील बदलांचा नेटका आढावा घेतला आहे
दिलीप गडकरी यांचा सुरेख लेख..
शेले ने म्हटलं आहे,
books are the companions of man
they are our real friends
they are never seen with their new faces
they enlight our thoughts
they elevate our ideas
and enlighte our thoughts to the gates of heaven.