Wednesday, September 17, 2025
Homeलेखआज, सेक्स वर्कर्स डे

आज, सेक्स वर्कर्स डे

जगातील अतिशय पुरातन व्यवसाय म्हणून वेश्या व्यवसाय ओळखला जातो. अनेकदा परिस्थितीवश काम करणाऱ्या सेक्स वर्कर्सना लोक खूप वाईट वागणूक देत असतात. त्यांचा घरीदारी तिरस्कार केला जातो. म्हणून समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलावी, त्यांना देखील सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून, दरवर्षी २ जून हा आंतरराष्ट्रीय ‘सेक्स वर्कर्स डे’ म्हणून पाळला जातो.

सेक्स वर्कर्सची व्यथा कळावी, ते सहन करत असलेले दु:ख समजावे यासाठी आतापर्यंत सेक्स वर्कर्सवर अनेक चित्रपट येऊन गेले. त्यामुळे या चित्रपटांमार्फत सेक्स वर्कर्सच्या भावना, वेदना, दुःख लोकांपर्यंत पोहोचायला मदत झाली.

या चित्रपटांमध्ये अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी सेक्स वर्करच्या भूमिका साकारल्या आहेत. बहुचर्चित आलिया भट्ट पासून ते जुलिया रॉबर्ट, करीना कपूरपर्यंत आणि राणी मुखर्जी ते विद्या बालनपर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये सेक्स वर्करची भूमिका साकारलेल्या आहेत.

‘सेक्स वर्कर्स’ चे भयानक आयुष्य समजावे, वास्तव किती क्रूर आहे, त्यांना किती पराकोटीच्या यातना भोगाव्या लागतात हे पांढरपेशा समाजाला समजावे, त्यांच्यात सहवेदना निर्माण व्हावी, काही मदतीचे हात पुढे यावेत यासाठी आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर, या विषयात, पीएचडी केलेल्या आणि सक्रिय मदतकार्य करीत असलेल्या डॉ राणी खेडीकर यांची “लालबत्ती” ही दाहक लेखमाला आपण दर गुरुवारी प्रसिध्द करीत असतो. या लेखमालेचा ३१ वा भाग आजच्या पोर्टलमध्ये आपण अवश्य वाचा. तसेच जे वाचक ही लेखमाला नियमित वाचत नसतील तर त्यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी पहिल्या भागापासून ही लेखमाला अवश्य वाचावी.

या निमित्ताने डॉ राणी खेडिकर करीत असलेल्या, त्यांच्या कामात आपण यथाशक्ती हातभार लावण्याचा संकल्प करू या.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं