आठवणी आपल्या माणसांच्या
हृदयापासून जपलेल्या नात्यांच्या
मंतरलेल्या शब्दांच्या……
अविस्मरणीय क्षणांच्या……
आठवणी आईच्या प्रेमळ स्पर्शाचा….
वडिलांच्या धाकाच्या…….
बहीण -भावाने सावरलेल्या बाजूच्या….
आजी आजोबांनी सांगितलेल्या
छान गोष्टींच्या…….
आठवणी पहिल्या त्या पगाराच्या…
देव्हाऱ्यात ठेवलेल्या लक्ष्मीच्या….
आई -वाडीलांसाठी घेतलेल्या
भेटवस्तूच्या……
डोळ्यातील टिपणाऱ्या आनंदाश्रूच्या….
आठवणी पहिल्या त्या भेटीच्या
जोडीदाराच्या सोबतीच्या…..
चंद्राच्या साक्षीच्या एकांतात
मारलेल्या गप्पाच्या……
आठवणी आपल्या मैत्रीच्या…….
मनातील अचूक ओळखणाऱ्या
त्या व्यक्ती च्या….
प्रेमळ त्या रागाच्या….
रुसण्याच्या व हक्काने चिडण्याच्या
आठवणी त्या भांडणाच्या….
अबोला धरलेल्या दिवसांच्या…..
समजावण्याचा व समजून घेण्याच्या….
सगळ विसरून पुन्हा एकत्र येण्याच्या…
आठवणी आयुष्याच्या वाटेवर
येणाऱ्या काही व्यक्तिंच्या…
तुझ्यासाठी काही पण
ते पळ तुझ्याशी बोलणार नाही
पर्यंतच्या…..
आठवणी चांगल्या वाईट दिवसांच्या…..
यशाच्या व अपयशाच्या…..
सावरणाऱ्या आपल्याच लोकांच्या…..
जगावणाऱ्या आत्मविश्वासाच्या……
आठवणी म्हणजे भावनांचा खेळ…
प्रियजनांशी जुळलेली ताळमेळ….
हृदयाच्या ठोक्यापासून मनाच्या
गाभाऱ्यापर्यंत…..
गुंफलेली ती सुंदर नाजूक वेल..
गुंफलेली ती सुंदर नाजूक वेल…

– रचना : रश्मी हेडे.

अप्रतिम
आभारी आहे सर
खूप छान आठवणींना उजाळा दिला
व्वा अप्रतिम