प्रतिभावंत गायिका, हसतमुख व्यक्तिमत्व, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका, ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, नाट्य संगीत, भजन इत्यादी प्रकारांवर प्रभुत्व असलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी विदुषी डॉ प्रभा अत्रे यांच्या निधनाची वार्ता समजली. त्यामुळे माझ्या मनाला खूप मोठा धक्का बसला.
लहानपणी माझे आजोबा प्रभा अत्रे यांची, ‘तन मन धन तोपे वारू’ आणि ‘जमुना किनारे मेरो गाव’ ही कॅसेट लावायचे. त्यातले काही कळत नव्हते तरी मी आवडीने कॅसेट ऐकायचे.
हळूहळू माझा विविध रागातील बंदिशींचा अभ्यास सुरू झाला आणि मला गानवर्धन स्पर्धेमध्ये प्रभाताईंच्या बंदिशी सादर करणे ही थीम असते तर त्या संधीच्या निमित्ताने त्या स्पर्धेची तयारी म्हणुन प्रभाताईंच्या विविध बंदीशी त्यांच्या compostios चा अभ्यास करायला सुरुवात केली.
जसे जसे त्यांचे गाणे मला आवडायला लागले आणि ऐकत असताना प्रभाताईंची अखंड संगीत साधना त्यांचे रियाजावरचे प्रेम, प्रत्येक रागातील स्वर लगाव सरगम ऐकत राहिल्यामुळे शास्त्रीय संगीताचा रियाज आणि प्रत्येक रागावर आणि सुरांवर स्वरलगावांवर किती प्रेम करावे लागते या सर्वांग सुंदर बाबींचा उपयोग मला माझ्या रियाझासाठी होत आहे.
जेव्हा २०२३ साली मी व्यास क्रिएशनच्या कार्यक्रमात प्रभाताईंना उद्घाटनाला आमंत्रित केले होते त्यानिमित्ताने त्या ठाण्याला आल्या त्याचा मला खूप आनंद झाला. कारण ज्यांना मी कॅसेट मध्ये, यू ट्यूब वर ऐकले होते त्यांना मी प्रत्यक्ष भेटणार होते, त्यांचा सहवास मिळणार होता, त्यामूळे मी खुश झाले. त्यांना भेटण्याची, ऐकण्याची स्वप्न बघण्याच्या अगोदर त्या कशा असतील स्वभावाने, कशा बोलतील माझ्याशी याचा मी विचार करत होते आणि तो दिवस उजाडला. महाराष्ट्र टाइम्सच्या रिपोर्टिंग निमित्ताने त्यांच्यासाठी भेट झाली असता त्यांनी आत्मसात केलेली किराणा घराणा गायन शैली सांगितिक प्रवास याविषयीच्या भरपूर आठवणींची शिदोरी माझ्याशी शेअर करत होत्या. त्या बोलत असताना मी खूप मोठी गायिका आहे असे त्यांनी दाखवले नाही.
त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर प्रभा ताईंनी मला माझ्या स्वतच्या सांगितिक प्रवासाविषयीचे काही क्षण आणि आठवणीं विचारल्या त्यामुळे मला सुद्धा व्यक्त होण्याची संधी मिळाली. माझा प्रवास आणि छोटेसे रेकॉर्डिंग ऐकवले. हे सर्व बघून प्रभाताई म्हणाल्या, बेटा खूप नावलौकिक मिळव, भरपुर ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम कर. गाणे आयुष्यभर सोडू नको, शिकतच राहा, ऐकत रहा, अखंड रियाझ, साधना, लिखाण कर आणि ख्याल गायकी आत्मसात कर. खूप मोठी गायिका हो” असा भरभरून आशीर्वाद दिला. त्यांनी पाठीवर दिलेला आशिर्वाद कायम लक्षात ठेवीन. आणि काय हवं असतं कलाकाराला ? अशा थोर व्यक्तींचा सहवास लाभला हे माझे भाग्य आहे.
— लेखन : सिद्धी पटवर्धन. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
प्रभाताईंच्या आठवणींना वंदन…!!