आताच ती दुःखद बातमी आली की लता दिदींचे निधन झाले, विश्वास बसत नव्हता पण सत्य स्वीकारावेच लागते.
मी खूपच भाग्यवान आहे की लतादीदीचा परिस स्पर्श मला झाला व माझे जीवन धन्य झाले.
माझ्या जीवनातील दुसरे रेकॉर्डिंग दीदी सोबत व किशोर कुमार यांच्या सोबत तारदेवच्या फिल्म सेंटरमध्ये झाले. त्यानंतर त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांत कोरस मध्ये भाग घेतला होता.
त्यांच्या सोबत अनेक स्टेज प्रोग्रॅम मध्येहि सहभागी होण्याचे भाग्य मिळाले.
पहिला प्रोग्राम 28 फेब्रुवारी 1981 रोजी औराद शहजानी जि. उस्मानाबाद येथे झाला. मा. दीनानाथ मंगेशकर कॉलेज च्या मदतीसाठी तो प्रोग्राम होता. त्यामध्ये सुरेश वाडकर, नितीन मुकेश, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनिल मोहिले, अमर हल्दीपुर असे अनेक कलाकार होते. याचे निवेदन माझे मित्र हरीष भिमानी यांनी केले.
दुसरा प्रोग्रॅम 28 फेब्रुवारी 1983 रोजी सोलापूर इथे वालचंद हिराचंद जन्म शताब्दी निमित्ताने झाला होता.
नंतर बाबा आमटे यांच्या आनंदवन साठी लता किशोर नाइट झाली होती, त्या प्रोग्राम मध्ये सहभाग होता.
त्यांच्या घरी अनेकदा जाण्याचा प्रसंग आला. मी माझ्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलो असता त्यांनी माझ्या पत्नी चे शिक्षण व संगीताची आवड या संबधी विचारले होते.
एकदा मी त्यांच्या घरी गणपतीची आरती त्यांच्या जवळ उभे राहून ऐकली. तश्या आठवणी खूपच आहेत पण आज शब्दच सुचतं नाहीत. लता दीदीनां भावपुर्ण श्रद्धांजली🙏🌸
– लेखन : उदय वाईकर. (सिने गायक)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
ग्रेट आणि नशिबवान आहात