एकदा काय घडले,
मला एक विचित्र स्वप्न पडले।
बाजार भरला होता आठवणींचा।
मनातल्या साठवणींचा।।
ठेल्यांवर काहीतरी मांडले होते।
वाहून खाली सांडले होते।।
जवळ जाऊन पाहिलं,
ती सुख दुःख होती।
वापरून टाकलेल्या कपड्यांसारखी पडली होती।
प्रत्येक ठेल्यावरचा अनुभव वेगळा होता।
सुखदुःख मिश्रित अनोखा सोहळा होता।।
आनंदाश्रू डोळ्यात जमले होते।
आठवणींच्या जगात मी रमले होते।।
मला एकदा एक स्वप्न पडले होते।।

– रचना : हर्षदा राणे.

आठवणी स्वप्नवत असतात. छान कविता.
सुंदर कविता