Friday, November 22, 2024
Homeलेखआणि आई आठवली…

आणि आई आठवली…

मूळच्या नागपूर येथील, पूर्वाश्रमीच्या आश्लेषा शरद मंजुळे विवाहानंतर आश्लेषा गान झाल्या. पतीच्या नोकरीनिमित्त सध्या त्यांचे वास्तव्य सातारा येथे आहे.

आश्लेषा यांनी नागपूर विद्यापीठातून बी. ए, बॅचलर इन मास कम्युनिकेशन या पदव्या प्राप्त केल्यानंतर नागपूर येथीलच
दै.देशोन्नती, दै. नवभारत येथे काही वर्ष उपसंपादक म्हणून काम केले आहे.तर दै. सकाळ नागपूर आवृत्तीत त्यांचे काही लेख प्रसिद्ध झाले आहेत.

शालेय आणि विद्यापीठ अथलेटिक्स स्पर्धा मध्ये त्यांची राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरावर निवड झाली होती. लग्नानंतर स्वखुशीने घराकडे लक्ष देण्यासाठी त्या पुणे येथे असताना त्यांनी ऑनलाईन होमडेकोररचा व्यवसाय केला आहे.

आश्लेषा आता नियमितपणे आपल्या पोर्टल साठी लेखन करणार आहेत. त्यांचे न्युज स्टोरी टुडे परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

“भूक नसो, पण शिदोरी असो” हे माझ्या आईचे नेहमीचे वाक्य ! या वाक्याची व्याप्ती माहिती असून सुद्धा याचा प्रत्यय मात्र मला नुकताच आला.

तसं तर प्रत्येक आईकडून मुलांना “संस्कार” शिदोरी मिळतंच असते. पण प्रवासात खाण्यासाठी आईने, आजीने, बहिणीने किंवा पत्नीने दिलेल्या शिदोरीने प्रवास सुखकर होतो आणि याच शिदोरीचे महत्व मला एका प्रवासादरम्यान नुकतंच समजलं.

मुळंचे आम्ही विदर्भातले. पण विवाहानंतर १५ वर्षापासून आमचं वास्तव्य पुण्यात होतं. त्यामुळे नागपूर – पुणे या लांबच्या प्रवासात शिदोरी नेणे मला काही नवीन नाही.

पण २ वर्षांपूर्वी आमची बदली पुण्याहून सातारला झाली. तसं ‘पुणे -सातारा’ हे अंतर म्हणजे ‘घर -आंगण’ ! त्यामुळे मी साताराहून पुण्याला जाताना कधीच शिदोरी नेत नसे. शिवाय रस्त्त्याने असलेल्या हॉटेल्समुळे तशी गरज पण कधी भासली नाही. फक्त मुलीसाठी टाईमपास म्हणून चिप्स, केक असे नेहमी जवळ असू देते.

नेहमीप्रमाणे या उन्हाळ्यात मी आणि माझी मुलगी माझ्या आईकडे पुण्याला चार दिवस राहायला गेलो. “चार दिवस राहून, तूप रोटी खाऊन, लठ्ठ होऊन” परत साताऱ्याकडे यायला निघालो. तर निघायच्या वेळेस आईची शिदोरीची बांधाबाध चालू होती आणि ते पाहून माझी चिडचिड सुरू झाली. पण नेहमीप्रमाणे माझ्या चिडचिडीकडे दुर्लक्ष करत आई पराठ्यांची शिदोरी माझ्या हातात देत म्हणाली, “रस्त्याने लाख हॉटले, दुकानें असतील पण तरी देखील शिदोरी सोबत असू दे आणि वाटेत गरज नाही भासली तर घरी जावून हाच डब्बा खा स्वयंपाक करू नको.”

आईची ही प्रेमळ आज्ञा ऐकून, मनात आज स्वयंपाकाला सुट्टी असे म्हणत तो डब्बा (शिदोरी) बॅगेत ठेवाला आणि सगळयांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. बसमध्ये बसल्यावर घरी जावून करायच्या कामाची यादी माझ्या मनात घोळू लागली.

मात्र या वेळेस नेहमीचा “पुणे – सातारा” हा दोन सव्वादोन तासाचा प्रवास चार तासांचा होईल, याची पुसटशिही कल्पना मला नव्हती. बाजूला बसलेल्या माझ्यासारख्या माहेरून परत जाणाऱ्या माझ्या बस सखी व तिच्या लहान मुलाशी आमच्या गप्पा चालू होत्या. पुणे सोडून एकच तास झाला असेल तोच आम्हाला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आमची बस ना पुढे जाऊ शकत होती ना मागे… एकंदरीत आम्ही “ट्रॅफिक जाम” मध्ये फसलो होतो. दूर दूर पर्यत गाड्याच गाड्या… एकही दुकान, ना हॉटेल…

हळूहळू बसमधील बच्चे कंपनीचा एकसुरात टाहो चालू झाला. माझ्याही मुलीला भूक लागली म्हणून मी तिला माझ्याजवळील चिप्स, केक दिले. पण तासभर हुन अधिक वेळ झाला तरी बस पुढे सरकत नाही हे पाहून आता मात्र तिने भूक लागली म्हणून तगादा चालू केला. तेच माझं लक्ष बॅगेतील शिदोरी कडे गेलं आणि मी क्षणाचाही विलंब न करता तिला एक पराठा दिला आणि बाजूला बसलेल्या बाल मित्रालाही देऊ केले. एक एक पराठा मुलांना देऊन आणि एकेक पराठा आम्ही खाऊन आमचा जठाराग्नी शांत केली.
आईने बळेच शिदोरी दिली नसती तर आमचे आणि विशेषत: मुलांचे किती हाल झाले असते याची मला कल्पना करवेना. म्हणून प्रत्येक घासासरशी मला आई आठवत राहिली.

माझी आई

आता वाहतूक हळूहळू सुरु झाली. २ तासात आम्ही सातारा गाठलं. तसे एकूण आम्ही चार तासात साताऱ्यात पोचलो. साताऱ्यात पोचताच आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. उतरता उतरता माझ्या बससखी ने पराठ्यासाठी माझे आभार मानले. तिचा निरोप घेऊन आम्ही आमच्या घरी आलो.

घरी येताच सर्वप्रथम आईला फोन करून झालेला प्रकार सांगत असताना, माझे डोळे भरून आले आणि आता आईच्या ऐवजी मीच म्हटलं…
“भूक नसो पण शिदोरी असो”!

— लेखन : आश्लेषा गान. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

14 COMMENTS

  1. गाव मॅडम यांनी शिदोरी संदर्भात लिहिलेला लेख अप्रतिम. हा लेख आठवण करून देतो, आईनं दिलेल्या आभाळभरून प्रेमाची.

  2. पुणे ते सातारा प्रवासाचे अनुभव आश्लेषा ने फारच सुंदर रीतीने वर्णन केलेला आहे.

  3. होय अगदी बरोबर आहे. सध्या मुंबई पुणे येथून प्रवास करताना शिदोरी किती आवश्यक आहे हे अतिशय छोट्या प्रसंगातून आश्लेषाने आपल्या पर्यंत पोहचवले… आश्लेषा तुला नवीन वाटचाली करीता शुभेच्छा… 💐💐💐

  4. Very well written… Simple common experience with a deep thought.
    Kudos to the writer… waiting for other piece of artwork.

  5. सुरेख लिहिलय, आणि हा प्रसंग सगळ्यांना ओळखीचा पण आहे। मी सहमत आहे, “भूक नसो पण शिदोरी असो”

  6. सौ. गान यांचा लेख छान आहे.. आईच्या लहानश्या शिकवणीचा अनुभव उत्तम मांडला आहे.. त्याला शिर्षक वेगळे असायला हवे होते असे मला वाटते.. प्रवासात अचानक आलेले ट्राफिक जाम चे संकट आणि त्यात आईने दिलेल्या खाऊ मुळे मात करता आली अशा अर्थाचे असायला हवे होते.. बाकी लेख उत्तम..खूप शुभेच्छा

  7. सौ. गान यांचा लेख छान आहे.. आईच्या लहानश्या शिकवणीचा अनुभव उत्तम मांडला आहे.. त्याला शिर्षक वेगळे असायला हवे होते असे मला वाटते.. प्रवासात अचानक आलेले ट्राफिक जाम चे संकट आणि त्यात आईने दिलेल्या खाऊ मुळे मात करता आली अशा अर्थाचे असायला हवे होते.. खूप शुभेच्छा

  8. आश्लेषा मुळात मी तुला कधीच या नावाने बोलले नाही कारण मी तुला नेहमी रिंकू याच नावाने बोलले आहे….
    आज हे वाचून खरचं आई ने दिलेली शिदोरी खूप महत्वाची आणि प्रेमाची असते… आणि त्यातच आपण कॉलेज मध्ये नेत असलेला आई नी दिलेला डब्बा अर्थातच शिदोरी आठवली…… तुझी मैत्रीण विशू…,

  9. सौ. गान यांचा लेख छान आहे.. आईच्या लहानश्या शिकवणीचा अनुभव उत्तम मांडला आहे.. त्याला शिर्षक वेगळे असायला हवे होते असे मला वाटते.. प्रवासात अचानक आलेले ट्राफिक जाम चे संकट आणि त्यात आईने दिलेल्या खाऊ मुळे मात करता आली अशा अर्थाचे असायला हवे होते.. बाकी लेख उत्तम..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments