Friday, July 4, 2025
Homeलेखआणि, मी पोलिस अधिकारी झाले !

आणि, मी पोलिस अधिकारी झाले !

– भाग 3
नमस्कार, मंडळी.
मागच्या भागात आपण पाहिले कि वडिलांच्या अकस्मात मृत्यूने माझे भावविश्व ढवळून निघाले. 12 वे 13 वे विधी झाले. मी नि:शब्द झाले होते.

1,2 दिवस गेले. घरच्यानी मला नाशिकला जाण्यासाठी तयारी करण्यास सांगितले. पण मी नकार दिला कारण आपल्या पाठीमागे अघटित घडते, आता घर सोडून कुठेच जायचे नाही असे मनाने घेतले होते. आता आईला सोडून जाण्यास मन तयार नव्हते.

घरच्यांनी समजावले. वडिलांच्या आत्म्यास वाईट वाटेल असे भावनिक आवाहन केले. मी देखिल नियती पुढे खऱ्या योग्याशिवाय कोणाची सत्ता चालते ? अशी समजूत करून घेतली व 14,15 दिवसांनी नाशिकला परतले.

नाशिकला येताच मैत्रिणींनी सांत्वन केले. रूटीन सुरू झाले. पण मनावरील जबरदस्त आघातामुळे मन काळवंडले होते. रात्री थोडा वेळ मिळाल्यावर मैत्रिणीचा टेपरेकाॅरडर घेवुन, ‘बाबूल प्यारे’ गाणे लावून अश्रूंना वाट मोकळी करून देत असे.

मला चांगलेच आठवते, मैदानात कवायतीचे वेळी भांडवलकर सर चूक झाल्यास ओरडत असत. तेंव्हा डोळे भरून आले कि भांडवलकर सरांना वाईट वाटे. त्यानी मला मैदान प्रमुख आता नाव आठवत नाही त्यांचे समोर उभे केले व फौजदार कधी रडत नसतो अशी समज दिली.

माझ्या रेक्टर स्व.ईनामदार मॅडम, पोलिस उपअधीक्षक, मुळे सर मला म्हणत, सुनिता तूझ्या स्वभावास अनुकूल खाते निवडले नाहीस !

इनामदार मॅडम समजावत, घरची आठवण आली तर माझ्याकडे येत जा. कधी कधी आपल्या घरीच मला जेवायला लावत असत. असो…

ट्रेनिंग सुरळीत चालू झाले. मैदानातून आल्यानंतर नाष्टा करून तयार होवुन इनडोअर क्लास चालू होत. क्लास मध्ये मैदानातील शारिरीक रेमट्यामुळे झोप अनावर होई. जितक्या प्रयन्त पूर्वक शिकवण्यावर मन केंद्रित करायचा प्रयत्न करे त्यापेक्षा वेगाने डोळे मिटायचे. सरांचा ओरडा खावा लागे.

मध्यन्तरामधे 15 मिनिटे विश्रांती असे. तेंव्हा काहीजण डाॅरमेटरीत जावुन छोटीशी डुलकी काढत. काहीजण चहा आदी वा तोंडावर पाणी मारून झोप घालवण्याचा प्रयत्न करत असू.

शिक्षण चालू होते.
“POLICE”
P-PANCTUL
POLITE
O-OBEDIENT
L-LOYAL
I-INTELLIGENT,INTEGRITY
C-COURAGEOUS,
COURTSY
E-EFFICENT.
वाचून मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले ना ? होय हाच अर्थ आहे पोलीसचा. असो विषयांतर नको.

पोलिस उपअधीक्षक दमामे सर, पब्लिक प्राॅस्युकुटर आकुत सर, पोलिस उपअधीक्षक निमजे सर, डाॅ. पाटील सर, पोलिस उपअधीक्षक मुळे सर व इतर अनुभवी अधिकारी, डाॅक्टर शिकवत असत.

दरम्यान 15 ऑगस्ट व रक्षाबंधन मुळे 2,3 दिवसांची सुट्टी मिळाली व मला कॅडेट मुलामधील भाऊ मिळाला
(दिलीप निकम).

दिवाळी आली. सुट्टीत गावी न जाण्याचा मी निर्णय घेतला. ईनामदार मॅडमना सांगितले. त्या ठिक आहे म्हणाल्या. मी इथेच आहे. तू रहा म्हणून सांगितले.

त्याच वेळी संगीता जाधव (जी माझी जिवाभावाची मैत्रिण आहे) ती मला म्हणाली, मी देखिल तुझ्या सोबत थांबते. असो…
आमचे ट्रेनिंग काॅलेजचे प्राचार्य आदरणीय चरणसिंह आझाद सर, उप प्राचार्य आदरणीय सुनील वैद्य सर सह्रदयी होते पण नंतर मात्र काही कारणाने आमचेवर
शिस्तीचा बडगा सुरू झाला व शिस्तबद्ध खात्याची झलक मिळाली.

बडा खाना, कल्चरल प्रोग्राम (जावेद सर) इ. मध्ये पहाता पहाता 6 महिने जवळ आले.

एक गोष्ट वर नमूद करायची राहून गेली आहे. आमच्या सोबत नक्की माहीत नाही पण 500 पुरूष ट्रेनी व 5,6 पोलिस उपअधीक्षक ट्रेनी सुध्दा होते.

ट्रेनिंग मध्ये रायफ़ल 303, पिस्तूल कवायतीचे प्रकार, परेड यांचे प्रशिक्षण होत होते. शिस्त अंगात भिनत होती. परीक्षा जवळ आली. कायद्याचा अभ्यास चालू होता होता परीक्षा (मैदानी, इनडोअर अभ्यास) झाली.
पोलिस युनिफॉर्म मिळाला होताच.

आम्ही 29 किंवा 30 नक्की आठवत नाही (त्यात गोव्याच्या 4जणी) पैकी एक स्पोर्टस् मुळे उशिरा हजर झालेले ट्रेनी सोडून आम्ही सर्व मुली पास झालो.
सुनिता पटाईत(सध्या काळबांडे) प्रथम आली. सोर्ड ऑफ ऑनर झाली. पासिंग आऊट झाली. खांद्यावर 2 स्टार लागले. (स्व.वडिलांची कमतरता जाणवली. ☺️आई, भाऊ व मेहुणे पासिंग आऊट साठी आले.)

7 दिवसाच्या सुट्टीनंतर बऱ्याच जणींची मुंबई येथे परिवीक्षाधिन म.पो.उप निरीक्षक म्हणून पहिलीच पोस्टींग झाली.
क्रमशः

सुनीता नाशिककर

– लेखन : सुनिता नाशिककर
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments