वस्त्र झाले सोवळे अन् देव झाले वेगळे
ओवळ्या देहांत उरली वासनांची देवळे
बासनातील वासनांना नेसवुनी सोवळे
का असे अव्हेरसी तू सृष्टीचे मधु सोहळे
भूक देहाची जित्या ना संपली ना भागली
भात ना लाभला, शिवूदे शीताला कावळे
चंद्र इथली भाकरी, सूर्य रोजच मावळे
पीठ भरडून जीवां, दळतात सारे आंधळे
एवढ्या गर्दीत इथल्या ओळखू तुला मी कसे
कोवळे ऊन तू की, अंधार मानू सावळे ?
युध्द आणि बुध्द वेड्या नव्हते कधीही वेगळे
झेंडा कुणाचाही असो फक्त मेले मावळे

– रचना : नयना निगळ्ये. अमेरिका
अप्रतिम कविता- आता इथे , अभिनंदन 👌👌🙏🙏🙂🙂