आता मनाप्रमाणे जगायचे,
अनं मुक्त मोकळे हसायचे,
कशास वेदना सांभाळाव्या,
कुठे सतत ते कुढायचे…!!!
मस्त सकाळी नव्या दमाने,
मुक्त हवेतच फिरून घ्यावे,
फुललेल्या त्या फुलाप्रमाणे,
बघ, आनंदाने झुलून घ्यावे,
आज नवा तो दिवस जागला,
कशा कालचे रूतायचे…!!!
ऊत्तम करूनी विचार सारे,
नवीन काही ते करूया न्यारे,
ज्याने दिधले आहे जीवन,
त्याला आता समजून घ्यारे,
जमेल तेवढी ध्यानधारणा,
शरणांगत ते रहायचे…!!!
अता मनाने समजून घ्यावे,
मनमौजेला आवर घालावे,
भावभावना खेळ पुरे तो,
इंद्रीयांपाठी किती धावावे,
आता ह्रदयी समाधान हो,
मन राधेसम करायचे…!!!
तोच दिसावा मुरलीधर अन,
मंजूळ नाद हा ऐकू यावा,
तल्लीनच मम चित्त रहावे,
ॐकाराचा ध्यास ही व्हावा,
पुढील पीढीला सोपवून ते,
विश्व वेगळे करायचे….!!!

– रचना : हेमंत भिडे. जळगाव
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800