आवरा शब्दांना आवरा,
सावरा भावना सावरा…!!!
मोजकेच पण मधूर बोला,
मुके अन्यथा आनंद झुला,
केवळ साध्या संवादाने,
काम स्वत:चे करा…!!!
कशास कटुता ती वाटावी,
नको भावना काळोखावी,
जगणे आहे क्षणी जाणा,
त्या त्वेशाला आवरा…!!!
प्रेम असुदे, प्रेम दिसू दे,
मुखावरती हास्य असू दे,
ह्रदयांतून ये करूणा सागर,
मनी बहरो मोगरा…!!!

– रचना : हेमंत भिडे. जळगाव
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
आदरणीय श्री हेमंत भिडे सर
वंदे मातरम् आणि नमस्कार
कविता फार सुंदर लिहिलेली आहे
आपले हार्दिक अभिनंदन
तर्फे
मदन लाठी
जळगाव