बदल्यत्या काळाची पावलं जे ओळखतात, त्या नुसार स्वतः बदलतात तेच लोकं नक्की यशस्वी होऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे मोहित मदन कोकिळ हे होत. पारंपरिक व्यवसाय न निवडता त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नवीन व्यवसाय निवडला, नवे काही करण्याचे धाडस केले आणि आज ते त्यांच्या उपक्रमात वेगाने आगेकूच करीत आहेत. जाणून घेऊ या त्यांची प्रेरक कथा….
मोहित मदन कोकिळ हे मशीन लर्निंग आणि डेटा सायन्समध्ये पदव्युत्तर पदवीसह विदयापीठ सुवर्णपदक विजेता आहेत. डेटा सायन्स कन्सल्टिंगमध्ये त्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे. मोहितचं व्यक्तिमत्व अतिशय महत्वाकांक्षी व निर्भीड आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा हे मोहित मदन कोकीळ यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथील एस एम एस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले. तर सातारा येथील वाय. सी. कॉलेजमध्ये त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे पुण्याला इंजीनिअरिंग पूर्ण केल्यानन्तर चेन्नई येथून एमबीएची पदवी संपादन केली.
मोहित यांचे वडील श्री मदनजी कोकीळ यांचा सोयाबीनचा व्यवसाय आहे. तर आई माधवी या गृहिणी आहेत. शिक्षणाच्या वेळी वडीलांनी खुप धावपळ केली, योग्य मार्गदर्शन केले त्यामुळेच ते यशस्वी वाटचाल करू शकले.
मोहित यांनी यापूर्वी अन्सर्ट यंग (EV) सह वरिष्ठ सल्लागार, पिरामल गृप आणि कोटक महिंद्रा बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यांना भारतातील टॉप २५ मशीन लर्निंग एक्स्पर्ट अवॉर्ड तर डेटा सायन्समधील उत्कृष्ट कार्यासाठी चार पुरस्कार मिळाले आहेत.
चांगली नोकरी मिळूनही स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा मोहितना स्वस्थ बसू देईना. म्हणून सुरक्षित नोकरी सोडण्याचा अतिशय धाडसी निर्णय त्यांनी घेतला व घरच्यांनी देखील साथ दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवला. योग्य वेळी घेतलेला हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईन्ट ठरला.
मोहित यांनी न २०२० साली मार्किटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली.या कंपनीचे ऑफिस मुंबईत अंधेरी मध्ये आहे. मार्किटिक्स हा अत्यंत पात्र आणि उत्कट डेटा सायन्स प्रोफेशनल्सचा संघ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमधील ताकद लक्षात घेता सुधारित वर्धित नफा आणि ग्राहक मुल्य वितरित करण्यासाठी ग्राहकांसोबत धोरणात्मक भागीदारी विकसित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
ग्राहकांच्या यशाला चालना देणे आणि त्यांचा समुदाय नाविन्यपूर्ण विश्लेषण उपाय आणि प्लॅटफॉर्मन्दारे संस्थासाठी योग्य निराकरणे प्रदान करण्यासाठी जी एक्स्टेंसिबल आहेत म्हणूनच केवळ वर्तमानाच नव्हे तर बाजाराच्या भविष्यातील गरजा देखील पूर्ण करण्यास सक्षम करण्यावर त्यांचे लक्ष असते.
नियोजन पूर्वक केलेल्या व्यवसायाचे संस्थांना
चांगले परिणाम मिळतात. अधिक खर्च न करता बचत केल्याने, सुधारित कार्यक्षमता, अधिक विक्री, उत्पन्नापासून ते सेवेच्या सुधारित गुणवतेपर्यंत त्यांचे ग्राहक शक्य तितके सर्वोत्तम व्यवसाय परिणाम देण्यास सक्षम राहतील यासाठी मोहितची संस्था कार्यरत आहे.
मोहितच्या कंपनीची उत्पादने आणि सेवा पुढीलप्रमाणे आहेत
१) व्यवसायासाठी एल आणि एमएल प्लॅटफॉर्म
२) डिजिटल कर्ज प्लॅटफॉर्म
३) एफएमसीजी/फार्मासाठी, एमएल प्लॅटफॉर्म
४ ) एल आणि एम एल इनसाट्स चॅटबॉट
५) मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी एमएल फ्लॅट फॉर्म
६) विम्यासाठी अंतर्दृष्टी आणि क्रॉस सेलिंग
७) स्टार्टअपसाठी AI & ML फ्लॅटफॉर्म.
मोहितची कंपनी कोटक महिंद्र बँक, एच डी एफ सी बँक, बँक ऑफ बरोडा, कॉ ऑपरेटिव्ह बँक ऑफ पुणे, मुंबई व कराड येथे कार्यरत आहेत. डिलोआईट,
ई वाय, बाकर्डी, पिरॅमल, आय पॅक, लेंड पार्टनर्स, क्रेडिट फेअर, अशा विविध कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी विदेशात देखील त्यांचे ग्राहक आहेत.
मोहितने कोरोनाच्या बिकट परिस्थितीत देखील कोणाचाही पगार कमी केला नाही. त्यांच्या टीममध्ये २० इंजिनिअर आहेत. पुढे देखील अनेक कंपन्या व
बँकांना मदत करण्याचे मोहितचे महत्वपुर्ण उद्दिष्ट आहे.
मोहितचे २०१६ लग्न झाले. पत्नी ऐश्वर्या ही देखील त्यांच्या बरोबरीने व्यवसायात मदत करते. ऐश्वर्याने बिझनेस अॅनालिटिक्स आणि बिझनेस इंटेलिजन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी घेतली आहे. तिला मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि डेटा व्हिज्युअलायझेशनचा चार वर्षाचा अनुभव आहे. यापूर्वी तिने ब्लू चिप कंपनीत डेटा सायन्स सल्लागार म्हणून काम केले आहे. तिने बँक फिनटेक आणि किरकोळ ग्राहकांसाठी भविष्यसुचक मॉडेल्स आणि क्रॉस सेल मॉडेल्स तयार केले आहेत.
मोहितने अगदी थोडयात अवधित मोठी मजल गाठली आहे. त्यांची यशस्वी वाटचाल पाहता एकच म्हणावे वाटते की, “मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनो मे जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती हे !”
अशा या जिद्दी, धाडसी मोहित सारख्या हरहुन्नरी तरुणाला, त्याच्या उज्वल भविष्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.