Friday, July 4, 2025
Homeलेखआपलं आयुर्वेद

आपलं आयुर्वेद

दीपावली कशी झाली मंडळी ?😀 फराळाच्या डब्यांनी तळ गाठला असेल 😅 आणि पोटोबा बोलू लागले असतील ! असो….

मागच्या भागात आपण आयुर्वेदाचा इतिहास व आयुर्वेदातील गुरूशिष्य परपंरा पाहिली.

आयुर्वेदाचा इतिहास मुख्यत: ३ काळात विभागला गेला आहे.
१) संहिताकाल – ई.सन पुर्व ५वे शतक ते ६व्या शतकापर्यंतचा काळ. आयुर्वेदाच्या अनेक मौलिक रचनांचा उगम या काळात झाला. आयुर्वेदाचे प्रमुख मुनी(चरक, सुश्रृत, वाग्भट) ह्यांच्या संहितांचा उगम या काळातच झाला. उदाहरणार्थ -आचार्य चरकांद्वारे कायचिकित्सा या भागाची निर्मिती झाली.
२) व्याख्या काल – ७ वे शतक -१५वे शतक हा टीकाकारांचा काळ म्हणून ओळखला जातो. आचार्य डल्हन-सुश्रृत टीका रसरत्नसमुच्चय हा शोधग्रंथ आचार्य वाग्भटांनी चरक, सुश्रृतसंहितेचा आधार घेऊन लिहीला.
३) विवृती काल- १४ वी शती -आधुनिक कालापर्यंत.
विविध विषयावर ग्रंथरचना झाल्या. माधवनिदान, ज्वरदर्पण इ.ग्रंथ ह्या काळात लिहीले गेले. चिकित्सेच्या द्दष्टीने भरपुर प्रयत्न ह्या काळात झाले व होत आहेत.
अगदी अलीकडच्या आताच्या काळातील करोना हे ह्याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे.

संक्रामक करोनाच्या महामारीवर उपचार करताना आयुर्वेदाच्या मुलभूत सिध्दांतांचा खूप उपयोग झाला. अजूनही नवनविन उपक्रम राबवले जात आहेत.
पुढील भागात आपण आधुनिक काळातील आयुर्वेद याबद्दल जाणून घेऊ…🙏

डॉ स्वाती दगडे

– लेखन : डॉ स्वाती दगडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments